Land buy and sell Record जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार अशाप्रकारे ऑनलाईन बघा

Land buy and sell Record

Land buy and sell Record भारतात जमीनीचे व्यवहार आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. राज्या राज्यांमध्ये देखील ग्रामीण आणि शहरी भागात जमीनीचे व्यवहार होत असतात. अशा वेळी भूमी अभिलेख विभागामार्फत या व्यवहारांवर नियंत्रण ठेवले जाते. व्यवहारांची नोंद केली जाते. आता आपण जमीनीच्या खरेदी विक्री संबंधी सर्व व्यवहार मोबाईलवर पाहू शकतो. Land buy and sell Record हे व्यवहार पाहण्याची प्रक्रिया आपण या लेखात पाहणार आहोत.

जमीन खरेदी विक्री व्यवहारासंबंधी आक्षेप असल्यास काय करावे?

खरेदी विक्री व्यवहाराच्या जमिनी बाबत आपला काही आक्षेप असल्यास 15 दिवसांच्या आत तो आक्षेप तलाठ्याकडे नोंदवू शकता. आपल्या गावातील तलाठ्याकडे सदरील जिनीच्या नोंदी होत असतात. परंतु आपल्या या व्यावराची माहिती असणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण ही माहिती अवघ्या 2 मिनिटात पाहू शकतो.

कोणत्याही प्रकारची जमीन खरेदी विक्री झाल्यास त्याची नोंद तलाठ्याकडे होत असते या व्यतिरिक्त विहीर, बोर, व इतर फेरफार याचीही नोंद  गावच्या तलाठ्याकडे असते. परंतु त्यापूर्वी तलाठी ऑनलाईन नोटीस काढत असतात. आपल्याला खाली सांगितल्या वेबसाइटवर आपण ही सदरील माहिती पाहू शकता.

जमीन खरेदी विक्री संबंधीत व्यवहार ऑनलाईन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi

या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची माहीत त्यात भरुन संबंधीत जमीनीच्या व्यवहारासंबंधी माहिती मिळवू शकता.

जमीनीसंबंधीत इतर व्यवहार ऑनलाईन

आता आपल्याला जमीनीसंबंधीत कोणतेही काम असेल ते ऑनलाईन करता येते. भाडेपट्टा, गहाणखतापासून ते प्लॉट, जमिनीच्या खरेदी-विक्रीसह विविध 70 प्रकारच्या व्यवहारांशी संबंधित असलेला नोंदणी व मुद्रांक विभागही आता ऑनलाइन झाला आहे. जमीन, जागेशी संबंधित संपूर्ण राज्यातील व्यवहार, रेडीरेक्नर, भाव आदींबाबतची सर्व माहिती आपल्याला www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर  पहायला मिळतात.

‘आय सरिता’ Isarita, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी बेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) या नवीन संकल्पनेने सारे व्यवहारविश्व आवाक्यात आणले आहे. या प्रकल्पामुळे फसवणुकीचे व्यवहार, जास्तीचे पैसे वसुली, वेळेचा अपव्यय, व्यवहारातील असुरक्षितता या गोष्टींना या प्रकल्पामुळे आळा बसणार आहे.

नोंदणी व मुद्राक शुल्क विभाग

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागामार्फत खरेदी-विक्री, करारनामे, प्रतिज्ञापत्रे, मृत्युपत्र, दान आदींसह आर्थिक व मालकी हक्कांचे व्यवहार केले जातात. हे सर्व व्यवहार देखील आपण आपल्या हातातील मोबाईलवर  ऑनलाईन पद्धतीने  पाहू शकतो. त्यासाठी राज्यात अशी 412 कार्यालये कार्यान्वित आहेत. राज्यभरातील प्रत्येक गाव, तांडे, वाड्यांपासून ते महानगरापर्यंत शेती, बिनशेती, घरे, गावठाण, गायरान, प्लॉट, फ्लॅट, पक्के बांधकाम आदींचे भाव, मालमत्ता क्रमांक आदी माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील कुठेही जमीनीचा व्यवहार झाल्यास मोबाईलवर समजू शकते

आपल्या महाराष्ट्र राज्यातील 9 विभागांमधील 360 उपकार्यालये, 31 जिल्हा कार्यालये, विभागीय व इतर सर्व कार्यालये  संगणीकृत करुन यामार्फत एकत्र जोडण्यात आली आहेत त्यामुळे  कोणी कोठे व्यवहार केला हे सहज कळू शकत आहे.

जागेचे दर, मुद्रांक शुल्काच्या रकमेचा अंदाज, नोंदणी कार्यालयांची माहिती, ऑनलाइन व्यवहार नोंदणी, व्यवहारांसाठी लागणा-या वेळेची आगाऊ बुकिंग, जमिनीच्या आधीच्या मूळ व्यवहाराची व मूळ मालकाची माहिती, व्यवहार झाल्याची खात्री, ऑनलाइन रेडीरेक्नर, ऑनलाइन पेमेंट, व्यवहार नोंदणीबाबत माहिती, नवीन योजना, शासकीय निर्णय, व्यवहाराशी संबंधित नवीन बातम्या, विवाह नोंदणी, व्यवहार नोंदणी, अर्ज, सर्वाधिक क्लिष्ट वाटणारी नोंदणी प्रक्रिया संकेतस्थळावर सहज कळते.

जमीनीचा ई-सर्च म्हणजे काय?

 राज्यात इच्छित स्थळी व्यवहार करताना तेथील जागेच्या रेडीरेक्नरप्रमाणे मूल्यांकन, मिळकतीची माहिती, मूळ मालकी, व्यवहारासाठी लागणारे मुद्रांक शुल्क आदींबाबत माहिती ई-सर्च पर्यायात उपलब्ध आहे. व्यवहार करायचा असल्यास नोंदणीसाठी आगाऊ टोकन बुकिंग करून कार्यालयात जाण्यासाठी तारीख आणि टाइम स्लॉटदेखील बुकिंग करता येतो.

ऑनलाईन पद्धतीने जमिनीचा नकाशा कसा पाहायचा ?

  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या mahabhunakasha.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्यानंतर तुम्ही शहरी की ग्रामीण नकाशा पाहायचा आहे, ते निवडा. तुमच्या जिल्ह्याचे, तालुक्याचे, गावाचे नाव टाका.
  • मग समोर स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हांला तुम्ही टाकलेल्या प्रदेशचा नकाशा दिसेल आणि डावीकडे प्लॉटप्रमाणे जमीन शोधण्याची सोय असते तिथे गट क्रमांक/खसरा क्रमांक टाकून सर्चवर क्लिक करा.
  • संबंधित jaminicha nakasha online तुम्ही पाहू शकाल आणि त्या जमिनीचा तपशील व मॅप रीपोर्टला सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या मालकी हक्काची माहिती डावीकडे नमूद केलेले तुम्हांला दिसू शकेल.  
  • जर त्या जमिनीचा नकाशा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा असेल तर तुम्ही रीपोर्ट पीडीएफवर क्लिक करा, तिथे मग डाउनलोड व प्रिंटचे ऑप्शन दिसतील तुम्ही ते सिलेक्ट करू शकता.