Land record: शेतरस्ता अडविल्यास काय कराल? कायदा काय सांगतो समजून घ्या?

Land record

Land record ग्रामिण भागात शेतजमिनीतून रस्ते जातात, पायवाटा जातात अशावेळी एखाद्याने रस्ता अडवला तर तुमच्या शेतजमीनीत जाण्यासाठी दुसरा रस्ता किंवा पायवाट निर्माण करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हे बरेचदा कोणाला माहिती नसते. त्यातुन भांडणे, क्लेश आणि कोर्ट कचेऱ्यांची Land record कामे वाढत जातात. तुमच्यासोबत देखील कुणी असे केल्यास म्हणजे तुमच्या शेतात जाणारा रस्ता बाजूच्या जमीन मालकाने अडविल्यास तुम्ही नेमके काय केले पाहिजे? शेत जमिनी सबंधीत कायद्यात नेमकी कोण कोणती तरतूद केलेली आहे याबद्दल आपण आज या लेखच्या माध्यामातून माहिती मिळविणार आहोत, shetrasta Adavnuk kayda

जमीनीसंबंधीत कायद्यातील कलम क्र, 20 आहे महत्त्वाचा कायदा.

जमीनीसंबंधक कायद्यातील कलम 20 अन्वये,  खाजगी मालकीच्या नाहीत अशा सगळ्या जमिनी, सार्वजनिक रस्ते, रस्ते, महामार्ग, रस्त्यावरील पूल, सर्व छोटे मोठे बंधारे यावर सरकारचा अधिकार आहे. ती जमीन सरकारची  आहे असे कायद्यानुसार सिद्ध होतो, त्याविरुद्ध एखादी जमीन सरकारची नसून ती मालकी हक्काची आहे असे कोणाला वाटत असल्यास,  संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात कलम 20 च्या नियमांनुसार तपास करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. shetrasta Adavnuk kayda

काय सांगतो 1966 चा जमीन महसूल कायदा कलम 143

तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल किंवा बाजूच्या जमीन मालकाने तुमचा रस्ता अडवला असेल तर नक्कीच तुम्ही नवीन रस्त्यासाठी अर्ज Rasta Magni arj करु शकता.  महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ नुसार तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी प्रत्येकाला करता येते किंवा तुमचा आधीचा उपलब्ध रस्ता कोणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट नुसार १९०६ कलम ५ मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तहसीलदार यांना रस्त्यासाठी लेखी अर्ज करून दाद मागू शकता.  Land record कोणाकडे अर्ज करायचे ते आपल्याला समजले पंरतु हा अर्ज कसा करावा हे आपण पुढील माहितीच्या आधारे समजून घेऊ,  Land law

शेतरस्ता अडविल्यास अर्ज कसा करायचा?

तुमच्या शेतजमीनीत जाण्यासाठीची रस्ता अडविण्यात आल्यास सर्वप्रथम तुम्हाला तहसिलदाराकडे नवीन रस्त्यासाठी अर्ज करावा लागेल. हा अर्ज ऑनलाईन स्वरुपात किंवा ऑफलाई लेखी स्वरुपात तुम्हाला तहसिलदार कार्यालयात सादर करायचा असतो. त्या अर्जासोबत तुमच्या शेतजमिनीची कागदपत्रे देखील जोडणे आवश्यक असते. Land low

शेतरस्त्याच्या मागणी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

  • तुमच्या जमिनीच्या आणि लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा.  ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करा तुमच्या पद्धतीने करा तुमच्या जमिनीचा संपूर्ण नकाशा  ( जमिनीचा नकाशा  ऑलाईन डाऊनलोड करा)
  • तुमच्या शेत जमिनीचा शासकीय मोजणी नकाशा.
  • तीन महिन्याच्या आतील  तुमच्या जमिनीचा चालू वर्षांतील 7/12 उतारा
  • तुमच्या शेताजवळच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा पूर्ण तपशील
  • सबंधित जमिनीचा जर कोर्टात काही वाद सुरू असेल तर त्याची संपूर्ण माहिती अर्जासोबत देणे आवश्यक असते.

तहसिलदाराकडे शेतरस्त्यासाठी अर्ज केल्यानंतर काय होते,

  • ज्या रस्त्याची मागणी करण्यात आली आहे त्याबाबत सर्व शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली येते
  • इतर जमीन मालकांची परवानगी घेतली जाते, तसेच त्यांचे मत मांडण्याची संधी दिली त्यांना दिली जाते.
  • किती फुटांचा रस्ता हवा आहे याबाबत अंदाज काढला जातो.
  • रस्त्याचा अंदाज यावा म्हणून सध्या ऑनलाईन नकाशा ही सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे,
  • अर्जदाराला  त्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे की नाही,  याची पुष्टी तहसीलदारा अधिकाऱ्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतच होत असते.

 

मामलतदार कोर्ट कायदा 1906 मधील जमिनीसंबंधीत महत्वाच्या तरतुदी. Land low

  • या कायद्यानुसार केलेले नियम हे केवळ शेतजमिनीसाठी लागू  होतात,  बिगरशेतजमिनीसाठी हे नियम लागू होत नाहीत.
  • हा कायदा मुंबई वगळल्यास इतर सगळ्याच राज्यांना लागू आहे.
  • या कायद्यानुसार शेत रस्त्यावरील बेकायदेशीर अडथळा दूर करता येतो परंतु शेताच्या बांधावर नवीन रस्ता बांधता येत नाही. Land record