11 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीतील दुध अनुदानाला मंजुरी

सरकारने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 5 रुपये प्रतिलिटर अनुदान योजनेंतर्गत 79 हजार 362 खासगी व सहकारी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 9 कोटी 58 लाख 51 हजार 50 रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

हे अनुदान 11 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत संघाकडे पाठवलेल्या दुधासाठी आहे. 10 मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी माहिती पाठवलेली नाही आता त्या शेतकऱ्यांना 15 एप्रिलपर्यंत माहिती पाठविण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हा दूध विकास अधिकारी नामदेव दवडते यांनी पुढे सांगितले की यानंतरच संबंधितांना अनुदान देण्यात येईल.

10 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या एक महिन्यासाठी ही अनुदान योजना होती. मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिसादामुळे या योजनेला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही माहिती जिल्हा दुग्धविकास विभागाद्वारे संकलित करण्यात आली आहे. सुमारे दीड लाख लिटर दुधाचे उत्पादन जिल्ह्यामधे दररोज होत असून, सुमारे एक लाख गाय दूध उत्पादक खासगी व सहकारी दूध संघांशी संबंधित आहेत.

त्यापैकी अनुदानाची रक्कम ही 79 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. दवडते यांनी ही रक्कम तब्बल 9 कोटी 58 लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले आहे. हे गाय दूध उत्पादक अनुदानास पात्र ठरले असल्याचं, 10 मार्चपर्यंत संघांनी सादर केलेल्या माहितीनुसार समोर आलं आहे. काही दूध उत्पादक शेतकऱ्यांद्वारे पाठवली गेली माहिती दुग्धविकास विभागाला अजून मिळाली नाही.

त्यामुळे अनेक उत्पादक अनुदानापासून वंचित आहेत. इतर दूध उत्पादकांनाही त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार 15 एप्रिलपर्यंत उर्वरित उत्पादकांना मुदत देण्यात आली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील गाय दूध उत्पादक होते. अखेर ही रक्कम 70 हजारांहून अधिक उत्पादकांच्या खात्यात जमा झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी दुग्धविकास विभागाचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यात वितरित करण्यात आलेल्या अनुदानांमध्ये केवळ चितळे डेअरीच्या 50 हजार सभासदांच्या 1 कोटी 20 लाख लिटर दुधावर सर्वात जास्त 6 कोटी रुपयाचे अनुदान तर राजारामबापू दूध संघातील 15 हजार सभासदांच्या 36 लाख लिटर दुधावर 1 कोटी 64 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्यामागेच हे अनुदान इतर सहकारी संस्था आणि खासगी दूध संघांच्या सभासदांना मिळालेले आहे.