Land Record on mobile: मागिल 150 वर्षांपासूनचे जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर

Land Record on mobile

Land Record on mobile जमिनीला सध्या गगनाचे भाव आले  आहेत असे म्हटले जाते, आणि ते खरे देखील आहे. जमिनीच्या खरेदी विक्रिचे व्यवहार लाखोंमध्ये होतात, आधी शहरी भागातील जमिनीला चांगला भाव मिळत असे. कारण शहरी भागात नवनवीन प्रकल्प उभे राहत, इमारती उभ्या राहत, विविध सुख सुविधा निर्माण केल्या जात असत त्यासाठी जमिनी विकत घेतल्या जात आणि त्याच जमिनीचे दर खूप जास्त होते. पण आता ग्रामिण भागातही जमिनीचे भाग गगनाला भिडले आहेत. राष्ट्रिय महामार्गांसाठी ज्या जमीन मालकांच्या जमिनी जातात त्यांना  रेडीरेकनरच्या हिशोबाने लाखो रुपये दिले जातात. Land Record

      तसेच जमीन खरेदी विक्री देखील केली जाते, अशावेळी एखाद्या जमिनीचा इतिहास म्हणजे या आधी कोण कोण त्या जमिनीचे माल होते या संबंधीची संपूर्ण माहिती  म्हणजेच तब्बल 150 वर्षापुर्वी पासूनची माहिती आपल्याला आपल्या मोबाईलच्या वापराने पाहता येणार आहे. ही माहीत कशी पहावी त्याची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे याची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

मागिल 150 ववर्षांपासूनचे जमीनीचे जुने सातबाऱ्यातील फेरफार पाहण्यासाठी पुढील प्रक्रीया करा

Land record 2023 पाहण्यासाठी पुढील साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जमीनीच्या सातबाऱ्यातील सर्व फेरफार ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. 

  • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जा.
  • पेजवरील ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records (Archived Documents या महत्त्वाच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’ हे  पेज  ओपन येईल.
  • समोर पेजवर उजवीकडे असलेला “भाषा’ पर्याय निवडा त्यातील  मराठी भाषेवर क्लिक करा.
  • महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत चालणाऱ्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.  या वेबसाईटवर लॉगीन आयडी आणि पासवर्ड टाकून तुमच्या नावाची नोंदणी करा  म्हणजेज रजीस्ट्रेशन करा. ते अनिवार्य असते, त्याशिवाय तुम्हाला पुढील प्रक्रिया करता येत नाही.  
  • रजीस्ट्रेशन करत असताना तुम्हाला पेजवर वैयक्तिक माहिती भरणे अनिवार्य असते, उदा.  तुमचे नाव, मधलं नाव,  आडनाव,  लिंग, राष्ट्रीयत्व,  मोबाईल क्रमांक या सर्व बाबी योग्य भरा. Land Record on mobile
  • त्यानंतर तुमची इतर माहिती देखील तुम्ही समोर दिसत असलेल्या रकान्यांमध्ये भरा.
  • ई मेल-आयडी, बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरुन झाल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचा रकाना  काळजीपुर्वक भरा. त्यानंतर Captcha चौकटीत टाईप करा. व सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आता तुमचे रजीस्ट्रेशन झाले आहे आणि तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर तुम्हाला हवी असलेली माहिती मिळवू शकता.
  • महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा निवडा. त्यानंतर तालुका,  गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा,  सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यामध्ये शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

•     तुम्ही शोधत असलेल्या जमिनीच्या फेरफासासंबंधीचा गट क्रमांक टाका व ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा.

•     ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसेल.  त्यात  जमीनीच्या सातबारामध्ये फेरफार केल्याचे वर्ष, क्रमांक अशी सविस्तर माहिती तुम्हाला ऑलाईन मिळून जाईल.  त्यावर क्लिक करून तुम्हाला ज्या वर्षात झालेला फेरफार पाहायचा आहे तो तुम्ही पाहू शकता. Land Record on mobile

जमीन खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्यां नागरिकांसाठी अत्यंत सोयीचे

      बरेचदा जमिनी खरेदी विक्री करताना फसवाफसवीचे व्यवहार होतात, जमिन दुसऱ्याच व्यक्तीची असते आणि ती वेगळीच व्यक्ती स्वतःची असे सांगून विकत असते, जमिनीला मिळालेल्या सर्वोच्च दरांमुळे अनेक ठिकाणी असे फ्रॉड होतात. तसेच संबंधीत फ्रॉड व्यवहारांसाठी जमिनीचे बनावट कागदपत्रं देखील फसवणारी व्यक्ती तयार करुन घेते. परंतु शासनाने जेव्हा पासून जमिनीचे सातबारा किंवा त्यातील फेरफार ऑनलाईन पद्धतीने पाहण्याची सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे तेव्हपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी विक्री करणाऱ्यांना चाप बसला आहे आणि अगदी पारदर्शक पद्धतीने जमिनीचे व्यवहार होऊ लागले आहे. Land Record on mobile