Stray Dogs: दारात ठेवा लाल निळ्या रंगाच्या पाण्याची बॉटल भटकी कुत्री पळून जातील

भटके कुत्रे म्हणजेच Stray Dogs सगळीकडेच दिसून येतात. शहरी भाग असो किंवा ग्रामिण भाग हे भटके कुत्र्यांचा वावर सगळीकडेच  असतो. काही पशूप्रेमी या भटक्या कुत्र्यांना जेवण देतात तर बरेचदा हे भटके कुत्रे स्वतःचे अन्न स्वतः शोधतात आणि उरिरड्यावरच राहतात. बरेचदा हे भटके कुत्रे अन्नाच्या शोधात सोसायच्या किंवा चाळींच्या परिसरात जाऊन खाण्याची सोय होण्याचे ठिकाण पाहतात परंतु बरेचदा या कुत्र्यांना आवरणे कठीण होऊन जाते. Keep away from stray dogs

या भटक्या कुत्र्यांनी चावल्याचे अनेक किस्से हल्ली घडू लागले आहेत. अनेक लहान मुलांवर देखील या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला सोशल मिडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे या कुत्र्यापासून दूर राहणेच सगळे पसंत करतात. पण या भटक्या कुत्र्यांना दूर कसं ठेवायचं आणि आपला परिसर स्वच्छ आणि भटक्या कुत्र्यांपासून मुक्त कसा बनवायचा ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.  Red colour water keeps stray dogs away

दरवाजात लाल निळ्या रंगाचे पाणी का ठेवावे

असं म्हटलं जातं की, गावठी कुत्र्याला हुसकावलं  की तो  जात नाही, काठी दाखवली तर मात्र तो  गुरगुरल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या वावराला सरावलेली कुत्री कोणालाच दाद देत नाहीत; पण यावर एक गावठी उपाय शोधला गेला आहे. दारात एका बाटलीत लाल रंगाचे पाणी भरून ठेवलं की कुत्रे ती बाटली पाहून तिथे थांबत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणून  अनेक गावांमध्ये आणि शहरी भागात सोसायट्यांमध्ये दारादारांत लाल  आणि निळ्या रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या जातात. stray dogs

लाल  निळ्या रंगाने कुत्रे का पळतात?

लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटलीला पाहून कुत्रे घाबरतात असे अनेकांना वाटते, आणि त्यांचा तसा अनुभव देखील आहे.  भटक्‍या कुत्र्यांना रोखण्याचा उपाय म्हणून लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या दारात, जवळपासच्या परिसरात, झाडांध्ये ठेवण्याचा उपाय सर्वत्र पोहोचला आहे. त्यामुळे भटकी कुत्री दारात येत नाहीत. दारात घाण देखील करीत नाहीत. रात्रीची दारात भुंकत नाहीत, असा अनुभव अनेकांना आला आहे. stray dogs

लाल आणि निळ्या रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरते, हा शोध किंवा निष्कर्ष कोणी काढला, याची कोणालाही माहिती नाही; पण एक बाटली घ्यायची, त्यात पाणी भरायचे, लाल रंग टाकायचा व ती बाटली दारात ठेवायची. त्यामुळे भटके कुत्रे तुमच्या दारात येणार नाहीत किंवा परिसरात देखील येणार नाहीत. stray dogs

काही श्वान तज्ञ असे म्हणतात की, कुत्र्यांना लाल रंगाची ऍलर्जी असते आणि त्यांना राग येतो. त्यामुळे ते त्या पाण्याजवळ  जाणे टाळतात. डोळ्यांच्या अंतर्गत रचनेनुसार श्वानांना लाल, निळा आणि हिरवा रंग ओळखताच येत नाही. परंतु कुत्र्यांना दूर ठेवण्यासाठी लाल रंगाच्या पाण्याचा वापर सगळीकडेच केला जातो.

कुत्रा चावल्यास काय करावे?

हल्ली भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या खूप वाढू लागल्या आहेत, त्यामुळे जर का भटका कुत्रा चावला तर नेमकेपणाने काय केले पाहिजे ते पाहूया. कुत्रा चावल्यानंतर सर्वप्रथम 24 तासांच्या आत इंजेक्शन घेणे अत्यंत महत्वाचे असते.  कुत्रा चावल्यास पाच इंजेक्शन्स घ्यावी लागतात. पहिले इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत, दुसरे इंजेक्शन तिसऱ्या दिवशी, तिसरे इंजेक्शन 7 व्या दिवशी आणि चौथे इंजेक्शन 14 व्या दिवशी आणि शेवटचं म्हणजेच पाचवं इंजेक्शन 28 व्या दिवशी घ्यावे लागते. आणि इजेक्शन नाही घेतले तर रेबीज होतो आणि रेबीज या रोगावर अजूनही कोणताच उपचार विज्ञानात नाही. ज्या व्यक्तीला कुत्रा चावला तो व्यक्ती मरु शकतो. त्यामुळे कुत्रा चावल्यास वेळीच उपचारास सुरुवात करावी. stray dogs