LIDCOM Education Loan भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे उलटूनही भारतात आजही काही अशा जाती/ जमाती आहेत ज्यांच्या आर्थिक परिस्थितीत आणि राहणीमानात अजूनही बदल झालेला नाही. हा समाज विकसित झालेला नाही. यापैकी एक म्हणजे चर्मकार समाज. दारिद्र्य रेषेखाली उत्पन्न असलेला हा समाज नेहमीच आर्थिक दृष्ट्या मागासलेलाच राहिलेला आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य शासनाने चर्मकार समाजातील तरुणांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणारी योजना राबवण्याचा ठराव मंजूर केला आहे.
संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ यांच्या मार्फत 50 टक्के सवलतीची शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनांतर्गत असलेल्या चर्मोद्योग विकास महामंडळाची ही योजना आहे.
LIDCOM चा फुल फॉर्म असा होतो की, Leather Industries Development Corporation of Maharashtra. ही संस्था पदव्यूत्तर शिक्षणासाठी 20 लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज देत आहे. ही योजना राज्य सरकार मार्फत राबवली जात असून या साठी देण्यात येणारा निधी राष्ट्रिय अनुसुचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली येथून येण्यात येणार आहे.
LIDCOM मार्फत शैक्षणिक कर्ज या योजनेचे उद्दिष्ट
या योजनेचा लाभ केवळ अनुसुचित जाती जमातीतील चर्मकार मुलांनाच घेता येणार आहे. तसेच चर्मकारांची सध्यस्थिती व जीवनशैली उंचावणे हेच ही योजना राबविण्यामागचे महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
LIDCOM शैक्षणिक कर्ज योजनेसाठी अर्जदाराची आवश्यक पात्रता
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार हा केवळ चर्मकार समाजातील असावा (ढोर, चांभार, होलार, मोची इ.).
- अर्जदार 18 ते 50 वयोगटातील असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.3,00,000/- पेक्षा कमी असावे.
- अर्जदाराला शैक्षणिक कर्ज दिलेल्या वेळेत भरणे देखील महत्त्वाचे आहे.
LIDCOM शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents For LODCOM Loan
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 2-पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- पदवी पर्यंतच्या शिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- ज्या संस्थेत शिक्षण घ्यायचे आहे त्या संस्थेकडून प्रवेश पत्र.
- परदेशात अभ्यासाच्या बाबतीत सशर्त प्रवेश पत्र विचारात घेतले जाऊ शकते.
- महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र
- अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने जारी केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र.
- बँक खाते
- कोणत्याही इतर बँके कडून कर्जाची थकबाकी असल्यास मागील 1 वर्षाचे कर्ज A/C स्टेटमेंट
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया Application at LIDCOM Mumbai
- या योजनेसाठी अर्जदारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- LIDCOM च्या जिल्हा कार्यालयातून अर्जाचे स्वरूप घ्या.
- सर्व अनिवार्य फील्ड भरा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र पेस्ट करा (स्वाक्षरी केलेले) आणि सर्व (स्व-प्रमाणित) अनिवार्य कागदपत्रे संलग्न करा.
- रीतसर स्वत: भरलेला आणि स्व:स्वाक्षरी केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह संबंधित जिल्हा कार्यालयात जमा करावा.
- या कार्यालयातून अर्ज यशस्वीरित्या जमा झाला की नाही याची खात्री करत पोच पावती मिळवा.
LIDCOM शैक्षणिक कर्ज योजनेचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे
- राज्यातील चर्मकार समाजातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ₹10,00,000 पर्यंतचे शैक्षणिक कर्ज.
- परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या चर्मकार समाजातील विद्यार्ध्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ₹20,00,000 पर्यंतचे शैक्षणिक कर्ज या योजने मार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
- या योजनेअतंर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा पुरुष लाभार्थीसाठी 4% प्रतिवर्ष असेल
- या योजनेअतंर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा महिला लाभार्थीसाठी 3.5% प्रतिवर्ष असेल.
LIDCOM शैक्षणिक कर्ज योजनेबाबात अधिक माहितीसाठी
LIDCOM शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत एखाद्या विद्यार्ध्याला लाभ घ्यायचा असेल किंवा माहिती मिळवायची असेल तर मुंबई येथील खालील पत्त्यावर तुम्ही संपर्क करु शकता.
कार्यालय पत्ता –
बॉम्बे लाईफ बिल्डींग,
5 वा मजला, 45,
वीर नरीमन रोड,
मुंबई- 400 001.
दुरध्वनी क्रमांक: 2204 4186, 22047157
इमेल आयडी.- mktprod@lidcom.co.in
वेबसाईट – https://lidcom.co.in/