Maharaastra Shochalay Anudan Yojna 2023 महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना – शौचालय बांधण्यासाठी सरकार देणार 12000 रु. अनुदान – असा करा अर्ज

Maharaastra Shochalay Anudan Yojna 2023

Maharaastra Shochalay Anudan Yojna 2023 भारतात ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात आणि त्यांच्याजवळ उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असते.  अशी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी असमर्थ असतात. ते खुल्यावर शौचास बसतात व खुल्यावर शौचास बसल्यावर परिसरात घाण निर्माण होते.  सर्वत्र दुर्गंधी पसरते व माशा, कीटक यांचा प्रादुर्भाव होतो. परिणामी परिसरात रोगराई पसरल्याने माणसे आजारी पडू लागतात.

ग्रामीण भागात नद्या जवळ असल्याने काही नागरीक तर नदीच्या किनाऱ्यावरच शौचास बसतात त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते. ते पाणी प्यायल्याने नागरीकांना विविध आजारांना सामोरे जावे लागेते.  या अशा ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांच्या समस्यांचा विचार करता त्यांची या समस्यांपासून सुटका करून त्यांना स्वतःचे शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करण्याच्या उद्देशाने तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशाला व राज्याला स्वच्छ बनविण्यासाठी नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करण्यासाठी राज्यात शौचालय अनुदान योजना Maharaastra Shochalay Anudan Yojna 2023 सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

Maharaastra Shochalay Anudan Yojna 2023 योजनमार्फत लाभार्थ्याला किती आर्थिक सहाय्य मिळते. 

 Maharashtra Government Scheme For Toilet Construction या योजनेअंतर्गत लाभार्थी कटुंबाला स्वतःचे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते व अनुदानाची रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केली जाते. शौचालय बांधल्यानंतर आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना थेट लाभार्थ्यांच्या बँक  खात्यात जमा केली जाते. या योजनेच्या अनुदानाचे पैसे हे दोन हप्त्यांमध्ये दिले जातात.

  • लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर पहिला हप्ता म्हणजेच 6000/- रु. दिले जातात.
  • योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांनी शौचालयाची तपासणी केल्यानंतर दुसरा हप्ता म्हणजेच 6000/- लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केला जातो.

 महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेसाठी पात्रता

  • अर्जदार ग्रामीण महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • स्वतःचे घर असावे.
  • कौटुंबिक वार्षीक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे
  • अर्जदार कुटुंबाचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे
  • इतर कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत शौचालय अनुदान यापुर्वी मिळालेले नसावे.

महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेअंतर्गत अर्ज कुठे व कसा करावा

http://swachhbharaturban.gov.in/ihhl/Swachhalaya.aspx ही या योजनेसंबंधीत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतो किंवा

  • गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्जाची प्रत मागून त्यानुसार तुम्ही शौचालयाच्या अनुदानासाठी आवेदन करु शकता.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराच्या आधारकार्डची प्रत
  • मतदार ओळखपत्राची प्रत
  • शिधापत्रिकेची प्रत
  • बँक पासबुकची प्रत
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो

कोण असू शकतात महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेचे लाभार्थी Shouchalay yojana maharashtra beneficiary

  • राज्यातील दारिद्र्य रेषेवरील कुटुंब
  • अनुसूचित जमातीतील कुटुंब
  • शारीरिक दृष्टया अपंग व्यक्तीचे कुटुंब
  • अनुसूचित जातीतील कुटुंब
  • कुटुंबातील प्रमुख स्त्रिया असलेले कुटुंब
  • शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी कुटुंब
  • अल्प व माध्यम भूधारक शेतकरी
  • घरकुल योजनेचे लाभार्थी कुटुंब
  • भूमिहीन कुटुंब

महाराष्ट्र शौचालय अनुदान 2023 योजनेची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण कुटुंबांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
  • योजनेच्या अनुदानाची रक्कम प्रत्येक शौचालयासाठी 12,000/- रुपये इतकी आहे.
  • अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनातर्फे पाठवले जाते.
  • ही योजना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येत आहे.
  •  महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना हि केवळ  आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबासाठीच असल्याकारणामुळे सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जात नाही.
  •  ज्या कुटुंबांकडे आधीपासून स्वतःचा शौचालय आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेमुळे महिलांना खुल्यावर शौचास बसण्याची गरज भासणार नाही.
  • या योजनेमुळे ग्रामीण भागातील कुटुंबांचे राहणीमान सुधारत आहे.
  • या योजनेमुळे ग्रामीण जीवन आजामुक्त होण्यास मदत होत आहे.
  • या योजनेमुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःचे शौचालयाचे बांधकाम करताना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.