Maharashtra Budget 2024: ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’ची महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2023-24 मध्ये घोषणा

Maharashtra Budget 2024 दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजीत पवार यांना राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, महिला,  कष्टकरी, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक,  आदिवासी, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. अजून एक महत्त्वाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, ती म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.  Mukhyamantri solar Pump Yojana

राज्यात आतापर्यंत किती कृषीपंप बसविण्यात आले?

प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 सालापासून राबविण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात  पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यात 1 लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  त्यापैकी आतापर्यंत  78 हजार 757 पंप कृषी पंप बसवण्यात  आले असल्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री  अजित पवार यांनी सांगितले आहे.

मगाले त्याला सौर ऊर्जा कृषी पंप मिळणार

ग्रामिण भागात लोडशेडींमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप या नवीन योजने अंतर्गत ८ लाख ५० हजार कृषी पंप बसवण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यंदा पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यात १ लाख कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 78 हजार 757 कृषी पंप बसवण्यात आले आहेत, ऊर्जा क्षेत्रात 40 टक्के अपारंपारिक उर्जेचा वापर करण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यातही रूफ टॉप सोलर योजना लागू करण्यात आली आहे.  त्यासाठी 78 हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे, असंही पवार म्हणाले. सर्व योजनांचे सौर उर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा दावाही अर्थमंत्र्यांनी केला. Mukhyamantri solar Pump Yojana

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजना

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवनविकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कुंपणासाठी अनुदान देण्याची घोषणा देखील अर्थमंत्री अजीत पवार यांनी केली आहे.  परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत परळी येथील जिरेवाडी येथे सोयाबीन प्रक्रिया उपकेंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवस्थापन विद्यालय स्थापन करण्याचे अर्थसंकल्पीय प्रस्तावात सांगण्यात आले आहे. solar krushi Pump Yojana

राज्याच पर्यटनाला चालना देण्यासाठी सरककार प्रयत्नशील

राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. राज्याचे शाश्वत पर्यटन धोरण आखणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील ११ गड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ जाहीर करण्याचा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे, तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच केंद्र सरकारने 8 हजार 616 कोटी रुपये सेवा वस्तु करापोटी राज्य सरकारला दिले आहेत, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा नियोजित आहे. त्यासाठी 7 हजार 600 कोटी रूपयांचा खर्च प्रस्तावित आहे. solar krushi Pump Yojana

बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लावण्याचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी पर्यायवरणाच्या बातम्या वेळच्या वेळी मिळाव्यात यासाठी पर्यावरण आणि हवामान बदलासाठी 245 कोटी रुपये अर्थसंकल्पात राखून ठेवण्यात आले आहेत. तसेच  वनविभागाला 2 हजार 507 कोटी तर मृदा आणि संवर्धन विभागाला 4 हजार 247 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. Mukhyamantri solar Pump Yojana

ग्रामिण भागाचा योग्य विकास व्हावा यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. त्यातून शेती, ग्रामिण रस्ते, पर्यटन या विविध गोष्टींवर अर्थसंकल्पात आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. ग्रामिण शेतकऱ्यांना शेतीसाठी ज्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देता येतील त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाकडून सुरु आहे.