Maharashtra Ration Card List: स्वतःच्या गावाची रेशन कार्ड यादी पाहणे झाले सोपे, आजच पहा रेशनकार्ड यादी

Maharashtra Ration Card List रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. भारतातील असे एकही कुटूंब नसेल ज्याच्याकडे रेशन कार्ड नसेल किंवा रेशन कार्डवर नाव नसेल. सुरुवातीला समाजातील  आर्थिक दुर्बल घटकांसाठी कमी पैशातील धान्य वितरीत करण्यासाठी वापरात येणारे रेशन कार्ड कालांतराने ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ लागले. आधारकार्ड हे ओळखपत्र सुरु व्हायच्या आधी रेशन कार्डवर असलेले नाव हे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे समजले जात असते. जन्म मृत्यू दाखला आणि रेशन कार्ड हे दोन्ही कागदपत्र महत्त्वाचे होते.

रेशन कार्ड डिजिटल सेवा

नागरिकांना सर्व सेवा सुविधा डिजिटल माध्यमातून मिळाव्यात यासाठी भारत सरकार विविध पातळ्यावर कामे करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड धारकांची यादी उपलब्ध करुन दिली आहे. या यादीच्या मदतीने आता प्रत्येक नागरिक घरबसल्या पाहू शकणार आहे की त्यांच्या जिल्ह्यात, गावात रेशन कार्ड धारक किती आहेत.  चला तर मग अधिक माहिती मिळवूया! Maharashtra Ration Card List

अशी पहा ऑनलाईन रेशनकार्ड यादी

नागरी व अन्न पुरवठा विभागामार्फत रेशन कार्डच्या माध्यमातून कमी किंमतीतील धान्य उपलब्ध करुन दिले जाते. तुम्हाला रेशन कार्ड यादी पाहायची असल्यास  नागरी व अन्न पुरवठा या विभागाच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देणे गरजेचे आहे. पुढील ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करुन तुम्ही रेशन कार्ड यादी पाहू शकता.

  • सर्वात आधी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट द्या. rcm.mahafood.gov.in या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या समोर नागरी व अन्न पुरवठा विभागाची वेबसाईट ओपन होईल. Maharashtra Ration Card List
  • नागरी व अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर वरती डाव्याबाजूला RATION CARD हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर कॅपचा कोड व्हेरीफाय करा
  • त्यानंतर एक नवीन पोज ओपन होईल त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा, मग त्या नंतर DFSO सिलेक्ट करावे लागेल.
  • मग तुमच्या रेशन कार्डचा प्रकार निवडा आणि view report वरती क्लिक करा.
  • जिल्ह्यां अंतर्गत येणाऱ्या DFSO चे नाव तुमच्या मोबाईलवर दिसेल. रेशनकार्ड यादी पाहण्यासाठी DFSO हा पर्याय सिलेक्ट करावे लागेल.
  • तुमचे DFSO सिलेक्ट केल्यानंतर, त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व TFSO ची लिस्ट येईल. त्यात आपल्या TFSO चे नाव पहा आणि सिलेक्ट करा.
  • TFSO हा पर्याय सिलेक्ट केल्या नंतर त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व राशन दुकानदारांची नावे आपल्या समोर येतील.त्यापैकी तुमच्या रेशन दुकानाचे नाव निवडा
  • तुम्ही ज्या दुकानातून रेशन घेता त्य दुकानाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर लगेचच तुम्हाला तेथील सर्व रेशन कार्ड धारकांची यादी पाहता येईल. Maharashtra Ration Card List

कोणत्या जिल्ह्यांची रेशन कार्ड यादी ऑनलाईन उपलब्ध आहे

महाराष्ट्रात अजून सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रेशनकार्ड यादी पाहण्याची सोय सुरु झालेली नाही. परंतु खाली दिलेल्या काही

नाशिक, अकोला, नागपूर, अहमदनगर, नांदेड, अमरावती, उस्मानाबाद, बीड, पालघर, औरंगाबाद, परभणी, भंडारा, पुणे, धुळे, रायगड, चंद्रपूर, सातारा, बुलढाणा, सांगली, हिंगोली, रत्नागिरी, गोंदिया, ठाणे, गडचिरोली, सोलापूर, जळगाव, सिंधुदुर्ग,      जालना, वर्धा, कोल्हापूर, वाशीम, मुंबई शहर, मुंबई उपनगर, यवतमाळ, नंदुरबार, लातूर  या जिल्ह्यांमधील कोणत्याही रेशन दुकानाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर तेथून धान्य वितरीत होणाऱ्या सर्व रेशन कार्ड धारकांची यादी तुम्हाला पाहता येईल. Maharashtra Ration Card List

आता डिजिटल रेशन कार्ड उपलब्ध होणार

भारत प्रशासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा सुविधा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळेच आता आपण रेशन कार्ड सारखे महत्त्वाचे कागदपत्र देखली डिजिटल स्वरुपात मिळवू शकणार आहोत. डिजिटल रेशनकार्ड कसे मिळवायचे हे जाणून घेण्यासाठी https://kopargaonlive.com/e-ration-card/ या लिंकवर क्लिक करा. Maharashtra Ration Card List