Land record: जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे तुमच्याकडे आहेत का?

आजच्या तारखेला जमिनीला खूपच जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करुन ती जमीन आपली आहे हे दाखवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करताना ज्या कागदपत्रांची आवश्यकता असते त्यांची सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत.

जमिनीचे खरेदी खत

जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार होतो तेव्हा त्या व्यवहारा दरम्याने झालेल्या कागदपत्रांमध्ये विक्रेत्याचे आणि जमीन खरेदी दाराचे नाव असते. त्याला जमिनीचे खरेदी खत असे म्हणतात. जमिनीच्या खरेदी खतावर ज्या व्यक्तीचे नाव आहे ती जमीन त्या व्यक्तीच्या मालकीची समजली जाते. त्यामुळे तुमच्या जमिनीचे खरेदी खत तुमच्या कडे असेल तर ते जपून ठेवा. जेणेकरुन पुढे कधीही तुमच्या जमिनीवर हक्क सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा खरेदी खत दाखवून तुम्ही तुमचा मालकी हक्क सिद्ध करु शकता.

जमिनीचे खरेदी खत तयार करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात हे जाणून घेण्यासाठी https://kopargaonlive.com/jamin-kharedi-khat/ या लिंकवर क्लिक करा.

जमिनीचा खाते उतारा किंवा 8 अ नमुना

शेत जमीन असो किंवा बिगर शेत जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली असते. जमिनिच्या सर्व गटक्रमांकांची एकत्रीत माहिती असलेले कागदपत्र म्हणजे 8- अ प्रमाणपत्र होय.  तुमची जमीन कोणकोणत्या  गावात आणि कोणकोणत्या गटात विभागली  गेली आहे हे समजून येण्यासाठी 8 अ उताऱ्याची मदत होते. त्यामुळे जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करताना हा 8 अ उतारा पुरावा म्हणून वापरता येतो. Land record

जमिनीचा सातबारा उतारा

जमिनीचे खरेदी खत आणि प्रॉपर्टी कार्ड या महत्त्वाच्या कागदपत्रांइतकेच जमिनीचा सातबारा हा कागदपत्र देखील तितकाच महत्त्वाचा आहे. 7/12 चा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी शासकीय महसूल विभागामार्फत दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत. त्यानुसारच जमिनीचा सातबारा उतारा बनलेले असतो, त्यामध्ये जमिनीचा संपूर्ण इतिहास आणि खरेदी विक्रीदाराची नावे अशी बरीच महत्त्वपूर्ण माहिती असते.

मोबाईल नंबरच्या मदतीने ऑनलाईन सातबारा उतारा कसा काढायचा ते जाणून घेण्यासाठी https://kopargaonlive.com/digitally-signed-satbara/ या लिंकवर क्लिक करा

जमीन मोजणीचा नकाशा

शेतजमीन असो किंवा बिगर शेतजमीन ती मोजण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. आणि  हे शासकीय अधिकारी येऊन मालकी हक्काप्रमाणे जमिनीचे नकाशे बनवतात आणि जमिनीचे योग्य वाटप केले जाते, जमिनीच्या सीमा आखल्या जातात.  सध्या डिजिटलायझेशन मुळे शासनाने अधिकृत नोंदणी असलेले सर्व नकाशे ऑनलाईन प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे आता कोणालाही घरबसल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने मिळविणे शक्य झाले आहे. जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने मिळवून मालकी हक्काचा पुरावा म्हणून तुम्ही तो वापरता येतो. जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढायचा हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही https://kopargaonlive.com/land-map/  या लिंकवर क्लिक करुन सविस्तर माहिती मिळवू शकता.

जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड  land property card

जमिनीच्या मालमत्ता पत्रकाला प्रॉपर्टी कार्ड असे म्हणतात.  जसे शेतजमिनीच्या मालकी अधिकाराविषयीच्या नोंदी सातबारा उताऱ्यात नमूद असतात तसेच  बिगर शेतजमिनीवरील मालमत्तेची नोंदणी, त्यावरील मालकी अधिकार या सर्व बाबी प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच  मालमत्ता पत्रकात नमूद केलेले असतात. प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेतजमिनीतील प्लॅट, बंगला, ऑफिस, फ्लॅट अशा स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क, मूल्य, शिर्षक, जागेचे क्षेत्रफळ, नोंदणी क्रमांक, कर्ज घेतल्याची माहिती, जमिनीवरील भागीदारी व ती संपत्ति कुणाच्या नावे हस्तांतरित करण्यात आली आहे अशी संपूर्ण माहिती नमूद केलेली असते.जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. Land record

जमीन महसूल भरल्याच्या पावत्या

जमीनीच्या मालकाला दरवर्षी जमिनीचा महसूल भरावा लागतो.  जमिनीचा हा वार्षिक पद्धतीने भरायचा असतो, जमिनीचा महसूल भसल्यानंतर तलाठी कार्यालयातून  पैसे भरल्याची पावती दिली जाते.  जमीन मालकाने ही पावती जपून ठेवणे खूप महत्त्वाचे असते, कारण  जमिनीसंदर्भात मालकी हक्क सिद्ध करण्याची वेळ आली तर या पावत्या एक पुरावा म्हणून वापरता येतात. Land record

जमिनिसंबंधीत खटल्यांची कागदपत्रे

बरेचदा जमिनीसंदर्भातील वादविवाद न्यायालयात जातात आणि वर्षानुवर्षे खटले चाललेले असतात. तुमच्या जमिनीसंदर्भातील न्यायालयीन खटल्यांचे कागदपत्रं जपून ठेवा. कारण हेच  खटल्यांचे कागदपत्रं तुम्हाला जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी हे उपयोगात येऊ शकतात. त्यात देखील जमिन मालकाचे नाव आणि संबंधित जमिनीची नोंद असलेला कागद हा खूप खूप महत्त्वाचा असतो.  त्यामुळे तुमच्या जमिनीचे आधीपासून काही खटले सुरु असल्यास तुम्ही ते पुरावे जपून ठेवा. पुढे जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी हे पुरावे म्हणून कामी येऊ शकतात. Land record