Maharastra Kisan Karj Mafi List: राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार

महाराष्ट्र शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी विविध योजना आणि शासन निर्णय जाहीर करीत असते. तशीच एक योजना म्हणजे महाराष्ट्र किसान कर्जमाफी योजना. तसेच या योजनेला महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे देखील नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. तसेच शासनाने योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी स्वतंत्र पोर्टल देखील सुरु केला आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून या शासकीय योजनेची अधिक माहिती मिळविणार आहोत. Maharastra Kisan Karj Mafi List

महाराष्ट्र किसान कर्जमाफी योजना

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत महात्मा फुले  शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येत आहे हीच महाराष्ट्र किसान कर्जमाफी योजना. या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्यांची कर्जे माफ केली जाणार आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती मिळवणार आहोत. Maharastra Kisan Karj Mafi List

2019 ते 2023 पर्यंत थकीत असलेले कर्ज

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आणि शेतीसाठी काढलेले कर्ज फेडणे कठीण झाले. असे असताना शासनाने एक क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. वर्ष 2019 पासून 2023 पर्यंत  ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे त्यांचे दीड लाखा पर्यंत कर्ज शासनाच्या माध्यमातून माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी  कर्ज व्याजासहित भरलेले आहे अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान देखील देण्यात येणार आहे.  Maharastra Kisan Karj Mafi List

आतपर्यंत किती रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहे?

महाराष्ट्र राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील उत्पादन देखील घटले होते. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून  अश्या शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. आतापर्यंत या  योजने अंतर्गत आत्तापर्यंत तब्बल रु. 52,562,00 लाख इतकी रक्कम शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहे. Maharastra Kisan Karj Mafi List

शासनाने किती निधी मंजूर केला आहे?

महात्मा फुले कर्जमाफी योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 2024 या वर्षात 38 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतात पाहता  आतापर्यंत इतका निधी कोणत्याही राज्य शासनाने कर्जमाफीसाठी मंजूर केलेला नाही. Maharastra Kisan Karj Mafi List

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?

महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतका मोठा निधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी मंजूर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,  या योजनेमध्ये तब्बल 90% शेतकऱ्यांची दीड लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे.  तसेच ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपले कर्ज व्याजासहीत भरले होते अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. Maharastra Kisan Karj Mafi List

या योजने अंतर्गत किती लाखापर्यंत कर्ज माफ होते?

महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 1.5 ते 2 लाखापर्यंतचे कर्ज शासनाच्या माध्यमातून माफ केले जाते, अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. Maharastra Kisan Karj Mafi List

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी

ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी साठी अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज शासनाच्या माध्यमातून स्वीकृत करण्यात आले आहेत अशांची यादी देखील शासनाने जाहीर केली आहे. https://mjpskyportal.maharashtra.gov.in/  सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची यादी डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे लॉगीन आयडी तयार करुन पहावे लागेल. तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुमच्याकडे लॉगीन आयडी आणि पासवर्ड आधी असेलच त्याचाच वापर करुन तुम्ही  वर लिंक दिलेल्या वेबसाईटवर यादी पाहू शकता.  Maharastra Kisan Karj Mafi List