Panjabrao Dakh : मे महिना सुरू झालेला आहे. एप्रिल महिना पूर्ण पावसातच गेलेला आहे. अवकाळी पावसाने व गारपिटीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र मे महिन्यात देखील एप्रिल महिन्यासारखा पुन्हा अवकाळी संकटं येणार आहे. आत्ताच 2 ते 3 दिवसांपूर्वी पावसाचे सत्र संपले आहे. यामुळे दोन-तीन दिवसांपासून हवामान कोरडे असून, उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे.
परंतु, राज्यात पुन्हा या महिन्यात अवकाळी पावसाचे व गारपिटीचे संकटं येणार आहे. यामुळे कांदा, हळद व फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असणार आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह बरसणार आहे. त्यामुळे आपली व वन्यप्राण्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. आत्ताच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे. ज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
या अंदाजात पंजाबरावांनी किती तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार, तसेच पावसाला कधी सुरुवात होईल व किती तारखेपर्यंत असेल विभागानुसार त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. चला तर मग पंजाबरावांनी दिलेला हवामान अंदाज जाणून घेऊया. panjabrao dakh live
Panjabrao Dakh Havaman Andaj
पंजाब डख यांनी मागील अंदाजात सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिल पासून उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. यामुळे उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळेल. परंतु, हळद व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असणार आहे.
राज्यात 7 मे ते 11 मे दरम्यान अवकाळी पाऊस पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला असून त्यातच आता 7 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस पडणार आहे, असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. (panjabrao dakh weather today)
राज्यात 6 मे पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे, हा देखील अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. परंतु, त्यानंतर मात्र 7 ते 11 तारखे दरम्यान राज्यात अवकाळी संकटं पाहायला मिळणार आहे. या कालावधीमध्ये राज्यात वादळी वारे तसेच विजांचा गडगडाट, गारपिटीसह पाऊस धुमाकूळ घालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 6 मे पर्यंत शेतातील हळद, कांदा काढून ठेवावा किंवा झाकून ठेवावा, असा सल्ला डख साहेबांनी दिला आहे.
मराठवाड्यात देखील सात मे पासून पाच दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचे पंजाबरावांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी 7 मे च्या आधी हळद व कांदा पिकांची काढणी करावी किंवा नीटनेटके व्यवस्थित झाकून ठेवावे. जे काही शेतकऱ्यांची पिके असतील ती 7 मे च्या आधी घरी आणवी किंवा शेतात व्यवस्थित ताडपत्रीने झाकून ठेवावी. panjabrao dakh today
यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात देखील 7 मे ते 11 मे या कालावधीत वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे. हा पाऊस कांदा, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा जरी ठरत असला तरी मात्र उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. कोकणात देखील सात मे पासून पावसाला सुरुवात होणार असून 11 मे पर्यंत पावसाचे सत्र चालणार आहे.
panjab dakh तर उत्तर महाराष्ट्रात 8 मे पासून पावसाला सुरुवात होईल अंदाज व्यक्त केला आहे. हा पाऊस 11 मे पर्यंत पडणार असल्याचे देखील सांगितले. यासोबतच मुंबई, नाशिक, आणि पुणे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
पंजाबराव डख यांचं म्हणणं आहे की, 6 मे पर्यंत जी पिके काढणीस आलेली आहे ती पिके काढून घ्यावी किंवा शेतात झाकून ठेवावी. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली की, 6 मे ते 11 मे दरम्यान महाराष्ट्रात वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा अंदाज लक्षात घ्यावा.