Mahatma Phule Karj Mafi Yojana 2024: महात्मा फुले कर्जमुक्ती योजना 2024, शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ

Mahatma Phule Karj Mafi Yojana 2024 महाराष्ट्रातील शेतकरी हा आजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहे. त्यामुळे आजही इथल्या शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून शेती करावी लागते, पावसाच्या अंदाजाने शेती करावी लागते. कधी पाऊस चांगला पडतो तर कधी पेरणीच्या वेळी पाऊसच नसतो त्यामुळे बरेचदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. बि बियाण्यासाठी, शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्याने घेतलेले कर्ज पीक न आल्याने तो फेडू शकत नाही आणि बँकेचे कर्मचारी त्याला सतत कर्जफेडीबाबत त्रास देतात. यातून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसतात.म्हणूनच महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बाबत एस योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे महात्मा फुले कर्जमाफी योजना. या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवूया.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना कधी सुरु करण्यात आली?

महाराष्ट्र राज्य कृषी पनण मंडळामार्फत दि. 21 डिसेंबर 2019 पासून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांना बँकांपासून आणि सावकारापासून होणारा त्रास लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरु केल्याचे दिसून येते. Mahatma Phule Karj Mafi Yojana 2024  

या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे उद्दिष्ट म्हणजे 2 लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ करणे हे आहे.

सरकार लवकरच  या योजनेची तीसरी यादी जाहीर करणार आहे.

महाराष्ट्र सरकार लवकरच  महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना नाव आलेले नाही. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे आणि अशा शेतकऱ्यांचा समावेश तिसऱ्या यादीमध्ये केला जाणार आहे.

 या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या  महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी दिली जाणार आहे. अशी मोठी घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. Mahatma Phule Karj Mafi Yojana 2024

शासनाने अल्पभूधारक तसेच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जामधून मुक्ती करण्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची सुरुवात केलेली आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देखील देण्यात येत आहे.

कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी कुठे पाहता येईल

  • महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची तीसरी यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेवा केंद्रामध्ये जाऊन यादी तपासावी लागेल.
  • तसेच ग्रामिण भागातील शेतकरी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने त्यांचे नाव तपासू शकता. Mahatma Phule Karj Mafi Yojana 2024

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी

  • महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://mjpskyloanwaiver.mahait.org/portal/login या लिंकवर क्लिक करुन अर्ज करु शकता.
  • विचारण्यात आलेली माहिती आणि तुमच्या पीकासंबंधीत कागदपत्रे अपलोड करुन तुम्ही या योजनाचे फायदा घेऊ शकता.
  • त्यामुळे तुमचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. Mahatma Phule Karj Mafi Yojana 2024  

महात्मा फुले कर्ज माफी यादी डाउनलोड २०२३

  • सर्वप्रथम https://mjpskyportal.maharashtra.gov.in/  या वेबसाईटला भेट द्या.
  • महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी योजनेच्या तिसऱ्या लाभार्थी यादीचे पहिले पान दिसेल:
  • हे महात्मा ज्योतिराव फुले किसान कार माफी योजनेसाठी खास तयार करण्यात आलेले पोर्टल आहे.
  • ही यादी केवळ सार्वजनिक सेवा केंद्रांद्वारे पोर्टलवर मिळू शकते

कर्जमाफी मिळविण्यासाठी सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती

  •  लाभार्थी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.
  • शासनातर्फे जाहिर होणाऱ्या या  याद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जखात्याला विशिष्ट ओळख क्रमांक दिलेला असेल.
  • शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डासोबत त्यांना मिळालेला विशिष्ट ओळख क्रमांक घेवून ‘आपले सरकार सेवा’  हे शासकीय केंद्र असून या केंद्रात जावून आपल्या आधार क्रमांकाची आणि कर्ज रकमेची पडताळणी करावी.  
  • ऑनलाईन तपासणी केल्यानंतर  शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम मान्य असल्यास नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम शासनामार्फत कर्जखात्यात जमा होईल. Mahatma Phule Karj Mafi Yojana 2024