Voter ID Card Online Download: डिजिटल वोटर आयडी डाऊनलोड करा, अगदी सोप्या पद्धतीने

Voter ID Card Online Download मतदार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी ओळखपत्र किंवा शासकीय कागदपत्र म्हणून देखील मतदार कार्ड विचारले जाते. आता लवकरच भारतभर लोकसभा निवडणूका होणार आहेत. त्यावेळी प्रत्येक नागरिकाकडे मतदार कार्ड असणे अत्यंत अनिवार्य असणार आहे. आणि जर का हे कार्ड तुमच्या कडून हरवले असेल किंवा तुमचे मतदार केंद्र एका ठिकाणी आहे आणि तुम्ही दुसऱ्याच ठिकाणी राहत असल्याने मतदार कार्ड मिळत नसेल तर काळजी करु नका तुम्ही आता डिजिटल पद्धतीने मतदार कार्ड मिळवू शकता आणि त्याचा मतदानाच्या वेळी वापर देखील करु शकता. चला तर मग जाणून घेऊनया डिजिटल वोटर आयडी कार्ड कसे डाऊनलोड करायचे. Voter ID Card Online Download

असे डाउनलोड करा तुमचे डिजिटल मतदार कार्ड

  • तुमचे मतदार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम  तुम्हाला http://voterportal.eci.gov.in/ किंवा https://nvsp.in/ या वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला मेन्यू नेव्हिगेशनमध्ये Download e-EPIC हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर Form6 वर जाऊन Apply online for registration of new voter ID या पर्यायावर क्लिक करा.
  • New User या पर्यायावर क्लिक करून येथे तुमचे नाव, वय आणि लिंग ही सर्व माहिती भरा.
  • तुमचा आधार कार्डवरील पत्ता आणि इतर माहिती समोर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
  • याशिवाय तुम्हाला दोन लोकांची माहिती द्यावी लागेल, जे तुमची ओळख पटवू शकतील.
  • त्यानंतर ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत.
  • त्यानंतर तुमच्या फोन आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक अ‍ॅप्लिकेशन नंबर येईल. या नंबरचा वापर मतदान ओळखपत्राचे स्टेट्स तपासण्यासाठी करात येईल.
  • वरती दिलेली पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता. Voter ID Card Online Download

डिजिटल मतदार कार्डचे फायदे समजून घ्या

  • मतदान कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरात येते. त्यामुळे तुमच्याकडे डिजिटल स्वरुपात मतदान कार्ड असणे आवश्यक असते. त्यामुळे ते हरवण्याची भीती वाटत नाही.
  • मतदान कार्ड 18 वर्षे किंवा त्याहून जास्त वर्षांपेक्षा वय असणारे नागरिक मतदार ओळखपत्र करिता अर्ज करू शकतात
  • डिजिटल मतदार कार्ड आपण कुठेही केव्हाही विचारले असता मोबाईलमध्ये दाखवू शकतो.
  • शासनाच्या विविध योजनांसाठी अर्ज करताना ओळखपत्र अपलोड करावे लागते अशावेळी हे डिजिटल मतदार कार्ड अपलोड करता येते.
  • भारतभर कुठेही प्रवास करताना आपले ओळखपत्र विचारल्यास आपण मतदार कार्ड लगेच डाऊनलोड करुन समोरच्या व्यक्तीला आपली ओळख सिद्ध करु शकतो.
  • नागरिकांचे ओरिजनल मतदार कार्ड हरवले असल्यास मतदार कर्ड ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करुन ओळखपत्र म्हणून वापरता येते. Voter ID Card Online Download

  भारतात यावर्षी लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणूका येऊ घातलेल्या आहेत. पुढच्याच महिन्यात लोकसभा निवडणूकांना भारतातील नागरिक मते नोंदवणार आहेत. तुम्ही  18 वर्षे वय पूर्ण असेल किंवा त्याहून जास्त वयाचे असाल तर आजच जाऊन तुमच्या मतदार कार्ड साठी नोंदणी करा. आणि लवकरात लवकर तुमचे मतदार कार्ड मिळवा. महाराष्ट्र शासन निवडणूक आयोगामार्फत नागरिकांना मतदार कार्ड देण्यात येते.  मतदार कार्ड अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते.  कारण तेच कार्ड मतदाराची ओळख असते.  मतदार कार्ड शिवाय कोणीही नागरिक त्यांचा मतदानाचा अधिकार बजावू शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत कसे तपासायचे ते एकदा समजून घ्या. Voter ID Card Online Download

मतदार यादीत तुमचे नाव तपासा

  • मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी आपण प्रथम निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे https://Electoralsearch.in
  • मतदार यादीत आपले तुमचे नाव शोधण्यासाठी स्वतःचे व वडिलांचे नाव टाकून तपासू शकता.
  • मतदार कार्डवर असलेल्या आपल्या ओळख क्रमांकानुसार देखील आपण  मतदार यादीत आपले नाव तपासू शकतो. How to check your name in voter list