Shetmal taran karj yojana 2024: शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात कर्ज उपपलब्ध करुन देणारी शेतमाल योजना

शेतकरी बदलते हवामान,  पाऊस पाणी, दुष्काळ या सगळ्या अडणींना तोंड देत शेती करतात. पीक घेतात आणि त्यानंतर जेव्हा शेतमाल विकण्यासाठी बाजारपेठात जातात तेव्हा त्यांना अगदी कवडी मोलाने त्यांचा शेतमाल विकावा लागतो. यामुळे शेतकरी खूपच हवालदिल झाला आहे.  शेतीमालाचे बाजार भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होताना दिसूनय येते. शेतकऱ्यांच्या या अडचणीच्या वेळी शासन मदतीला धावून आले असून शेतमाल तारण कर्ज घेऊन तातडीच्या गरजा शेतकऱ्यांना भागविता येतात. पुढे शेतकऱ्यांना बाजारात तेजी आल्यानंतर शेतीमालाची विक्री केल्यास फायदा होतो. म्हणूनच महाराष्ट्र राज्य पणन महामंडळामार्फत शेतीमाल तारण कर्ज योजना राबवली जात आहे. याअंतर्गत शेतमालाच्या किमतीच्या 75 टक्के कर्ज 6 टक्के व्याज दराने दिले जाते. चला तर मग जाणून घेऊ काय आहे ही योजना. Shetmal taran karj yojana 2024

काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना?

 शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतमाल तारण कर्ज योजना सुरु केली आहे. विविध ग्रामिण भागात स्थानिक ठिकाणांवर शेतमाल साठवण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजार पेठेत विक्रीसाठी शेतकऱ्यांमार्फत आणला जातो. त्यामुळे बाजारपेठेत शेतमालाचे दर उतरतात. हा शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतमाल काही व्यापारी आणि मध्यस्ती साठवून ठेवतात आणि काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात तेव्हा त्याच शेतमालाला जास्त भाव मिळतो, Shetmal taran karj yojana 2024

या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य तो भाव मिळत नाही. तो व्यापारी आणि मध्यस्ती यांचा फायदा होतो. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या  शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत  1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवली जात आहे. Shetmal taran karj yojana 2024

शेतीमाल तारण योजनेत कोणकोणती धान्य येतात?

शेतीमाल तारण योजनेअंतर्गत काही धान्य शासनाने मंजूर केलेली आहेत, त्याच प्रकारच्या शेतमालासाठी ही योजना लागू होते.  या योजनेमध्ये मूग,  तूर, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, भात, चना, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, राजमा, काजू बी, बेदाणा, सुपारी व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे.  शासनाच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किंमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून देण्यात येते. Shetmal taran karj yojana 2024

इतकेच काय तर शेतमाल तारण योजनेअंतर्गत  शासनाच्या कोणत्याही वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.  ही  योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असुन सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते.  

शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या शेतकरी तारण कर्ज योजनेची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण पुढे पाहू Shetmal taran karj yojana 2024

  • शेतमाल तारण कर्ज योजनेमार्फत  केवळ उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्वीकारला जातो. बाजारातील मध्यस्ती आणि व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्विकारला जात नाही.
  • शेतकऱ्यांकडून तारण ठेवलेल्या शेतमालाची किमंत ही शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत किंवा त्यादिवसाचे बाजारभाव यापैकी जे कमी असेल ते फायनल करण्याच येते.
  • तारण कर्जाची मुदत 6 महिने आहे.  तारण कर्जास व्याजाचा दर 6% आहे.
  • तारण कर्जाची 180 दिवस मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीस पणन मंडळाकडून 1% किंवा 3% व्याज प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांनी मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत नाही.
  • तारण कर्जाची विहित मुदतीत परतफेड केल्यास बाजार समितीकडून कृषि पणन मंडळास 3% प्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड. (उर्वरीत 3% व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत नाही.
  • 6 महिने मुदतीनंतर सहा महिन्यापर्यत 8 टक्के व्याज दर व त्याचे पुढील सहा महिन्याकरिता 12 टक्के दराने व्याज आकारणी केली जाते.
  • तारण ठेवलेल्या शेतमालाची योग्य प्रकारे साठवण करण्याची संपूर्ण जाबाबदारी बाजार समितीची असून हे काम बाजारसमिती विनामुल्य करते.
  • शेतकऱ्यांच्या तारणातील शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी बाजार समितीची  असते. Shetmal taran karj yojana 2024

शेतकऱ्यांसाठी कृषी तारण योजेनेसाठी शासनामार्फत अधिक माहितीसाठी संपर्क

शेतकऱ्यांना या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असलल्यास शासनामार्फत संपर्क क्रमांक आणि वेबसाईट देण्यात आली आहे.

  • संपर्क क्रमांक  8657593808 आणि 8657593809
  • http://mjpsky.maharashtra.gov.in ऑनलाईन पद्धतीने मदत मिळविण्यासाठी तुम्ही या लिकंवर क्लिक करुन पुढील मदत मिळवू शकता. Shetmal taran karj yojana 2024