Mhada Lottery News: म्हाडाची स्वस्त घरे शोधत आहात? इथे अर्ज नोंदणीला सुरुवात! आताच अर्ज करा!

Mhada Lottery News: आपले सुद्धा हक्काचे आणि कायमस्वरूपी घर असावे असे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते. आपण ज्या शहरात काम करतो त्या शहरात आपले स्वतःचे घर असणे जवळपास प्रत्येकासाठीच खूप सोयीचे असते आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळीच जण खूप कठोर परिश्रम करतात आणि पैसे वाचवून घर घेण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी मग ते सतत घराच्या किमतीवर आणि योग्य संधींवर लक्ष ठेऊन असतात आणि जेव्हा त्यांना हवी असलेली संधी, घराची योग्य किंमत सापडते तेव्हा ते ती संधी सोडत नाहीत. तुम्हीही स्वतःचे घर घेण्याचे तुमचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात का? मग तर ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे.

काय आहे म्हाडाची लॉटरी? | What is MHADA Lottery?

म्हाडा किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण ही परवडणाऱ्या घरांचा विकास, पुनर्बांधणी आणि झोपडपट्टी पुनर्विकासासाठी काम करणारी नोडल एजन्सी आहे. म्हाडा लॉटरी किंवा म्हाडाची गृहनिर्माण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात लोकांना कमीत कमी किमतीच्या परवडणाऱ्या घरांचे वाटप करणारी एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. म्हाडा लॉटरी 2024 महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी परवडणारी परंतु टिकाऊ गृहनिर्माण पर्याय प्रदान करत असल्याने ही एक बहुप्रतिक्षित योजना राहिली आहे. Mhada Lottery News

2012 मधे मुंबईत म्हाडाची पहिली लॉटरी योजना सुरू करण्यात आली होती जिचा उद्देश लॉटरी पद्धतीने 2600 हून अधिक अपार्टमेंट्स उपलब्ध करून देण्याचा होता. तेव्हापासून म्हाडा लॉटरी 2017 मुंबई आणि सर्वात अलीकडील म्हाडा लॉटरी योजना 2023 सह इतर अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील बेघर लोकांना कमी किमतीत किंवा परवडणाऱ्या घरांचे पर्याय उपलब्ध करून देणं हे 1948 मध्ये स्थापन झालेल्या म्हाडाचे उद्दिष्ट आहे. या MHADA लॉटरी 2024 अंतर्गत मुंबईसाठी पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, रिटर्न प्रोसेस आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते या लेखात जाणून घ्या. सध्या म्हाडा, पुणे, कोकण आणि औरंगाबाद विभागांमधे घरांच्या वाटपासाठी लॉटरी योजनांवर काम करत आहे.

सर्व उत्पन्न गटातील नागरिकांना परवडेल अशी विविध वयोगटातील घरे देऊन म्हाडाने अनेकांना पुन्हा एकदा समान हक्क दिला आहे. पुणे म्हाडा लॉटरी 2024 अंतर्गत 4,777 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्यामुळे पुण्यातील लोकांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. या घरांसाठी अर्ज नोंदणीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. Mhada Lottery News

या घरांची सोडत पुणे म्हाडाने 7 मार्च 2024 रोजी जाहीर केली होता. त्याअंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर इत्यादी जिल्ह्यात घरे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी फक्त पुण्यामधील घरांची संख्या 745 आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये 561 घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

अर्ज प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या तारखा | Important Dates for Application Process
सदर नोंदणी प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणी 8 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजता सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया 8 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु 10 एप्रिल 2024 रोजी रात्री 10.59 वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. अर्जदारांनी 12 एप्रिलपर्यंत ठेव शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. दरम्यान, घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी या www.mhada.gov.in  किंवा या वेबसाईट ला https://mhada.gov.in भेट द्यावी. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तुम्ही देखील या सोडतीत सहभागी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला lottery.mhada.gov.in वर नोंदणी करावी लागेल.

म्हाडा लॉटरी योजना 2024 साठी अर्ज करण्यासाठी, खालील स्टेप्स फॉलो करा.

MHADA लॉटरी योजना 2024 साठी अर्ज करण्याच्या स्टेप्स | Mhada Lottery News

स्टेप 1: म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या म्हणजेच lottery.mhada.gov.in, ही वेबसाईट ओपन करा.

स्टेप 2: मुख्यपृष्ठावर दिसणारा पुणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह (FCFS) पर्याय निवडा.

स्टेप 3: आता, हाउसिंग लिंकवर क्लिक करा – housing.mhada.gov.in

स्टेप 4: तुमचा पॅन नंबर आणि OTP किंवा पॅन नंबर आणि पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉग इन करा.

स्टेप 5: नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, मासिक उत्पन्न, बँक खाते क्रमांक आणि पॅन कार्ड तपशील यासारखी म्हाडा लॉटरी अर्ज फॉर्म फील्ड भरा.

स्टेप 6: नंतर ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, अर्ज पात्रता पडताळणी प्रक्रियेतून जाईल.

स्टेप 7: त्यानंतर, अर्जासाठी आवश्यक रजिस्ट्रेशन फी भरण्यासाठी पेमेंट पद्धत निवडून पेमेंट पूर्ण करा.

स्टेप 8: नंतर सबमिट वर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. सबमिट केल्यानंतर reference नंबर सह पावती सेव्ह करण्यास विसरू नका.

म्हाडाच्या या गृहनिर्माण योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेदरम्यान म्हाडाकडून एकूण 18 बहुविध योजना जारी करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 59 आरक्षित घरांचे सर्वसाधारण विभाजन, प्रधानमंत्री आवास योजना प्रायव्हेट पार्टनरशीप योजनेसाठी (पीपीपी) 978 आरक्षित घरे आणि उर्वरित घरे अर्जदारांना उपलब्ध करून दिली जातील आणि विजेत्यांची नावे जाहीर केली जातील. Mhada Lottery News