Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form ‘माझी लाडकी बहिण योजना’ अर्ज प्रक्रिया झाली आणखी सोपी, जाणून घ्या योजनेतील बदल.

महाराष्ट्र सरकार नेहमीच महिलांच्या उन्नतीसाठी आणि महिलांना समाजात एकसमान दर्जा मिळण्यासाठी विविध योजना राबवत आहे. नवजात बालकांच्या नावापुढे त्याच्या आईचे नाव बंधनकारक करण्याचा निर्णय असो कींवा लेक लाडकी योजना असो तसेच आरक्षित जाती जमातीलमधील विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाचे संपूर्ण शुल्क माफ करण्याची योजना असो. महाराष्ट्र शासन नेहमीच महिलांच्या सन्मानासाठी विविध योजना जाहीर करीत आहे. त्यातीलच एक योजना म्हणजेच  माझी लाडकी बहिण योजना. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form

योजनेची सुरुवात कधी झाली?

जून 2024 महिन्याच्या अखेरीस विधीमंडळात माझी लाडकी बहिण या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि 1 जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले. योजनेची घोषणा करताना विविध अटी व शर्ती ठेवण्यात आल्या होत्या परंतु अनेक महिलांची आर्थिक स्थिती आणि कमी लाभ पाहता काही अटी शिथिल करण्यात आल्या. या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील शासनाने अत्यंत सोपी आणि सहज केली आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form

योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी शासनाने उपलब्ध केले तीन पर्याय

माझी लाडकी बहिण योजनेसाठी ज्या महिला अर्ज करु इच्छित आहेत त्यांना एकाच ठिकाणी जाऊन अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने महिलांना तीन पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. ते पुढील प्रमाणे.  

  • पोर्टल आणि वेबसाईट, सेतू केंद्रांच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया
  • ग्रामपंचायत, नगर पंचयात व महापालिका कार्यालयांमार्फत अर्ज प्रक्रिया
  • आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यतून अर्ज प्रक्रिया Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form
  • पोर्टल आणि वेबसाईट, सेतू केंद्रांच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया

या पर्यायाच्या मदतीने अर्जदार महिला शासकीय वेबसाईट किंवा सेतू केंद्रांच्या मदतीने योजनेसाठी अर्ज करु शकणार आहेत.

  • ग्रामपंचायत, नगर पंचयात व महापालिका कार्यालयांमार्फत अर्ज प्रक्रिया

या पर्यायाच्या मदतीने अर्जदार महिला ग्रामपंचायत, नगर पंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयांमार्फत  योजनेसाठी ऑनलाईन  – ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकणार आहेत.

  • आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यतून अर्ज प्रक्रिया

शासनाने शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी आपले सरकार सेवा केंद्र आणि कॉमन सर्विसेस सेटर जागोजागी उभे केले आहेत. या केंद्राची कामे असतात की नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणे आणि नागरिकांना अर्ज भरण्यास मदत करणे ही या केंद्रांची कामे असतात. लाडकी बहिण योजनेसाठी देखील नागरिक या सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करु शकणार आहेत. 

अर्जदारांकडून पैसे मागितल्यास कडक कारवाई

अनेकदा शासकिय योजना म्हटले की अर्जदारांकडून पैसे उकळले जातात, त्यामुळे या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी शासन वरी सर्व पर्यांयांमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन देत आहे. प्रत्येक अर्जामागे 50 रु इतके मानधन निश्चित करण्यात आले आहे. हे पैसे शासन सेतू केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, अंगणवाडी केंद्र तत्सम फॉर्म भरणाऱ्या अधिकाऱ्यांना देणार आहे. त्यामुळे अर्जदार महिलांनी कोणत्याही प्रकारचा शुल्क शासनाच्या कोणत्याही कर्मचारी, अधिकाऱ्यांना देऊ नये. किंवा शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी झाल्यास लगेचच नागरिकांना शासनाला अवगत करणे गरजेचे आहे. सेतू केंद्र आणि आपले सरकार केंद्र यांचे परवाने रद्द केले जातील किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्यास त्यांना निलंबित देखील केले जाईल असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात सांगितले आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form