SSC CHSL Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सरळसेवा पद्धतीने महाभरती; पात्रता फक्त 12 वी पास

SSC CHSL Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC ही भारत सरकार अंतर्गत काम करणारी संस्था आहे. या संस्थेचे काम आहे की,भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि  शासकीय विभागांमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करणे. या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. 12 पास तरुणांना शासकीय नोकरी मिळविण्यासाठी ही उत्तम संधी आहे असे म्हणता येईल. तब्बल 3712 जागासाठी ही महाभरती जाहीर करण्यात आली आहे.  या संधीचा फायदा घ्या आणि या लेखामध्ये दिल्याप्रमाणे आजच दिलेल्या पदासाठी अर्ज करा. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि बरच काही जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.

या पदांसाठी जाहिरात सादर करण्यात आली आहे

ज्या पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ती पदे पुढील प्रमाणे आहेत.

  1. कनिष्ठ विभाग लिपिक
  2.  कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
  3. डेटा एंट्री ऑपरेटर
  4. डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

आवश्यक वयोमर्यादा

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या भरती अंतर्गत अर्ज करताना महत्त्वाची गोष्ट म्हणते या पदांसाठी अर्जदाराची आवश्यक वयोमर्यादा काय असेल. तर दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण ते 27 वर्षांपर्यंतचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. तसेच आरक्षित प्रवर्गांसाठी म्हणजेच SC/ST साठी 5 वर्षे सूट आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. SSC CHSL Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार  12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित पदांसाठी टायपिंग प्रमाणपत्र आणि संगणक कौशल्य देखील असणे आवश्यक आहे. SSC CHSL Recruitment 2024

परीक्षा शुल्क किती असेल

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत परीक्षेसाठी अर्ज करताना परीक्षा शुल्क देखील अर्जदारांना भरावे लागणार आहे. परंतु काही प्रवर्गांसाठी हे शुल्क माफ करण्यात आले आहे.

जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी ₹100/- परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. तसेच आरक्षीत प्रवर्गासाठी म्हणजेच SC/ST/PWD/ExSM आणि महिला उमेदवारांनी कोणताही परीक्षा शुल्क भरावा लागणार नाही. SSC CHSL Recruitment 2024

आवश्यक कागदपत्रे

स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक  असणार आहेत.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे मतदार ओळखपत्र
  • अर्जदाराचे पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • शाळा किंवा कॉलेजमार्फत देण्यात आलेले ओळखपत्र.
  • 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
  • संरक्षण मंत्रालयाने दिलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक.

वेतन किती असेल?

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांसाठी वेतन किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर पुढे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

कनिष्ठ विभाग लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक– 19,900/- ते 63,200/-

डेटा एंट्री ऑपरेटर – 25,500/- ते 81,100/-

डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – 25,500/- ते 81,100/-

अर्ज कुठे करायचा?

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत  जाहीर करण्यात आलेल्या पदांसाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. https://ssc.gov.in/login या लिंकवर क्लिक करुन तुम्ही इच्छीत पदासाठी अर्ज करु शकता. SSC CHSL Recruitment 2024

परीक्षा कधी होतील?

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जाहीर झालेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना

परीक्षा कधी होतील असा प्रश्न पडतोच. तर शासनाने जाहीर केलेल्या जाहिरातीत असे म्हटले आहे की, यासंबंधीत पदांसाठीच्या परीक्षा या जुन-जुलै2024 मध्ये होणार आहेत. SSC CHSL Recruitment 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करताना तुम्ही https://ssc.gov.in/  या लिंकवर क्लिक करा. जेणेकरुन तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकाल. SSC CHSL Recruitment 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3712 पदांसाठी जाहिर झालेली पदभरती साठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर तुम्हाला हे जाणून घेणे अपेक्षित आहे की, दिनांक 7 मे 2024 ही अंतिम तारीख असून या तारीख नंतर कोणतेही अर्ज घेतले जाणार नाहीत. SSC CHSL Recruitment 2024

जाहिरात येथे पहा

भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करु शकता.

https://ssc.gov.in/api/attachment/uploads/masterData/NoticeBoards/Notice%20of%20CHSLE%202024_05_04_24.pdf

12 वी पास तरुणांना शासकीय नोकरीत सहभागी होण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे ही संधी गमाऊ नका आणि आजच या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा. SSC CHSL Recruitment 2024