Plates Making Business In Marathi: मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असलेला उद्योग म्हणजे पेपर प्लेट उद्योग,

Plates Making Business In Marathi

Plates Making Business in Marathi ग्रामिण भाग असो किंवा शहरी भागात लग्न सोहळ्यात आणि घरातील कौटुंबिका कार्यक्रम उदा. वाढदिवस,  हळदीचा कार्यक्रम, साखरपुडा, सत्यनारायणाची पुजा, भंडारा  अशा कार्यक्रमांमध्ये पेपर प्लेट जेवणासाठी वापरल्या जातात. या पेपर प्लेट use and throw म्हणजेच वापरुन फेकण्याच्या असतात. ज्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि मोठ्या सोहळ्यांमध्ये सोयीचे देखील होते. म्हणूनच पेपल प्लेटचा उद्योगा अत्यंत चांगल्या प्रकारे चालणारा उद्योग आहे. यातून मिळणारा नफा देखील जास्त असतो कारण वर्षाचे बाराही महिने या पेपर प्लेट्सना मागणी असते.

Plates Making Business In Marathi महिना 50 ते 60 हजार रुपये मिळवून देणारा उत्तम व्यवसाय म्हणजे पेपर प्लेट उद्योग

कोणतीही जोखीम नसलेला आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे पेपर प्लेट्स बनवण्याचा उद्योग. कारण या मध्ये पेपर प्लेट्स बनवणारी मशीन्स खेरदीची गुंतवणूक आणि कच्चा माल खरेदीसाठी लागणारे पैसे या व्यतिरिक्त कोणतीही अतिरिक्त गुंतवणूक करावी लागत नाही. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य देखील देत असते.  यासाठी मुद्रा कर्ज योजनेच्या माध्यमातून तुम्ही कर्ज घेऊ शकता, त्यातून मशिन्स आणि कच्चा माल खरेदी करुन व्यवसायाला सुरुवात करु शकता. जागा तुमची असेल तर तो अतिरिक्त खर्च नसतो परंतु तरीही तुमच्या घरातील छोट्याशा खोलीत मावेल अशी असते त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय अगदी छोट्याशा खोलीतून देखील सुरु करु शकता आणि महिना 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता.  मग हा व्यवसाय नेमका करायचा कसा याची संपूर्ण माहिती आम्ही आजच्या या लेखामध्ये घेऊन आलो आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि व्यवसायाची ही संकल्पना तुम्हाला देखील राबवता येईल याचा विचार आणि कृती सुरु करा. Plates Making Business in Marathi

पेपर प्लेट उद्योग कसा सुरू करावा?

पेपर प्लेट उद्योग सुरु नेकमा कसा करायचा, कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. गुंतवणूक कशी करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही घेऊन आलो आहोत.

 व्यवसायासाठी जागा –

पेपर प्लेट उद्योग सुरू करण्यासाठी तुमच्याकडे सर्वात प्रथम  जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तुमची स्वतःची जागा  असेल तर उत्तम किंवा तुम्ही भाड्याने देखील जागा घेऊ शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी पेपर प्लेट उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान 400 स्केअर फूट जागा पाहिजे. Plates Making Business in Marathi

पेपर प्लेट मशिन –

पेपर प्लेटचा उद्योग सुरू करण्यासाठी पेपर प्लेट मशीन खरेदी करावी लागणार आहे. ही एकमेव आणि महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक देखील असणार आहे. हा व्यवसाय मॅन्युअल मशीन ने सुरू करायचा असेल तर तुम्हाला आवश्यक साहित्यासह 20,000/- रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. किंवा जर तुम्ही अटोमाटिक मशीन ने हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याची किंमत 40,000 ते 50,000/- रुपये एवढी आहे तुम्हाला शासनाकडून मुद्रा लोनच्या माध्यमातून आर्थिक मदत देखील होत असते, या लेखाच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता की मुद्रा लोन कसे मिळवायचे आणि या कर्जासाठी कुठे अर्ज करायचा. ही मशिन तुम्ही स्वतः चालवू शकता किंवा कालांतराने व्यवसाय उत्तम नफा मिळवून देऊ लागल्यानंतर तुम्ही मजूर देखील ठेवू शकता. Plates Making Business in Marathi

कच्चा माल –

पेपर प्लेट व्यवसाय सुरु करतान तुम्हाला कच्च्या मालाची आवश्यकता असते. हा कच्चा माल तुम्ही होलसेल मार्केटमधून खरेदी करु शकता आणि भरपूर नफा कमाऊ शकता. याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहू.

पेपर प्लेट उद्योगासाठी लागणारा कच्चा माल व त्याची किंमत

 पेपर प्लेट उद्योगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कच्चा माल खरेदी करणे. 

  • सर्वोत्तम गुणवत्ता असलेला पेपर तुम्हाला 50 रू. ते 60 रू. प्रती किलोने मिळतो.
  • बोटॉम रील ची किंमत 40 रुपये प्रति किलो ग्रॅम आहे.
  • स्वयंचलित माशीन च्या साहाय्याने तासाला 1000 प्लेट बनवू शकता. आणि दिवसाला 8 तास काम करून तुम्ही 8000 प्लेट्स बनवू शकता.
  • महिन्याला कमीत कमी तुम्ही 50,000/- रुपये कमवू शकता.

तुम्ही ग्रामिण भागात राहत असाल आणि तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही नक्कीच या व्यवसायाचा विचार करु शकता. Plates Making Business in Marathi