PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! पंतप्रधान किसान योजनेचा 16 वा हप्ता, या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे होणार जमा!

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: नवीन वर्षात (new year 2024) शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून भेट मिळेल. नवीन वर्षात 16वा पीएम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर रोजी देशभरातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. यानंतर शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता या महिन्यात येण्याची शक्यता आहे. हा हप्ता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. PM Kisan Yojana

मागील हप्त्यांची माहिती | PM Kisan Yojana
12 वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये जमा करण्यात आला.
13 वा हप्ता फेब्रुवारी 2023 मध्ये जमा करण्यात आला.
14वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी जमा करण्यात आला.
15 वा हप्ता केंद्राने नोव्हेंबर 2023 मध्ये जमा केला होता.

नवीन वर्षात सरकार द्वारे शेतकऱ्यांना भेट
केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो. या योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी एकूण 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. नवीन वर्ष 2024 मध्ये शेतकऱ्यांना या 16 व्या हप्त्याचा लाभ घेता येणार आहे. PM Kisan Yojana

16 वा हप्ता खात्यात कधी जमा होईल?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेद्वारे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 15 हप्ते मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15 वा हप्ता जारी केला, ज्यामुळे 8 कोटी लाभार्थींना फायदा झाला. आता शेतकरी पुढील 16 व्या हप्त्याची वाट पाहत असल्याचं दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा येणार हा 16 वा हप्ता फेब्रुवारी-मार्च या महिन्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. PM Kisan Yojana

वंचित शेतकऱ्यांनाही लाभ | PM Kisan Yojana
अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. कागदपत्रे सादर न केल्याने हप्ता थांबला आहे. आता ही समस्या देखील दूर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय हे विशेष अभियान राबवणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सहभागी होणार आहे. देशभरातील 4 लाखांहून अधिक सामायिक सेवा केंद्रांद्वारे हे अभियान गावोगावी राबविण्यात येणार आहे.

वंचित शेतकऱ्यांना मदत | PM Kisan Yojana
कागदपत्रे अपूर्ण असल्याने अनेक शेतकऱ्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते.
या समस्येला तोंड देण्यासाठी 12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सहभागी होणार आहे.
देशभरातील 4 लाखांहून अधिक सामायिक सेवा केंद्रांद्वारे हे अभियान गावोगावी राबविण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हप्ते जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. PM Kisan Yojana

येथे लाभार्थी यादी तपासा | PM Kisan Yojana
सर्वप्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
याठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.
येथे लाभार्थी स्थिती (beneficiary status) पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पेज ओपन होईल.
नवीन पेज ओपन झाल्यावर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे या तीन क्रमांकाद्वारे तपासू शकता.

तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर याठिकाणी एंटर करा. यानंतर तुम्हाला Get Data वर क्लिक करायचं आहे.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती दिसेल.
तुम्हाला FTO जनरेट केलेले आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसल्यास, याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया केली जात आहे. PM Kisan Yojana