PVC Pipe Scheme: पाईप लाईन अनुदान योजना 2023

PVC Pipe Scheme

PVC Pipe Scheme केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करीत आहे. शेतात पीक चांगले यावे, शेतकऱ्यांना उत्तम रोजगार मिळावा, शेतातील धान्याला बाजारात योग्य हमीभाव मिळावा यासाठी शासन नेहमीच विविध योजना राबवत असते

शेतीसाठी पाणी जितके महत्त्वाचे असते तितकीच महत्त्वाची असते शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची पाईप लाईन. विहिर असो किंवा तलाव असोत, संपूर्ण शेतीला किंवा शेतातील पिकाला पाणी पुरविण्यासाठी शासनाने पाईप लाईन अनुदान योजना 2023 सुरु केली आहे. या योजनेबद्दल आज आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत. PVC Pipe Scheme

काय आहे नेमकी ही पाईप लाईन योजना २०२३

ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आहे तसेच पीकांना पाणी देण्यासाठी इतर कोणतेही जलस्त्रोत उपलब्ध आहे. परंतू शेतापर्यत पाणी पोहोचविण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे पाईप लाईन नाही, अशा गरजू शेतकऱ्यांना शेतात पाईप लाईन टाकण्यासाठी शासन मदत करीत आहे. सध्या महागाईमुळे शेतकऱ्यांना शेतात pvc pipeline टाकणे शक्य होत नाही. पारंपारीक पाट पद्धतीने पिकांना लावलेले पाणी अर्धे जमिनीत मुरते आणि पिकाला योग्य पद्धतीने पाणी मिळत नाही. अशावेळी शेतकऱ्यांनी केवळ शासनाकडे Mahadbt वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जेथून शेतकऱ्यांना शेतात पाईप लाईन तयार करण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. PVC Pipe Scheme

Mahadbt म्हणजे काय?               

MAHADBT म्हणजे  महाराष्ट्र डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे याचे पूर्ण स्वरुप असून. या शासकीय पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी किंवा इतर नागरिक त्यांच्या शासकीय सुविधांसाठी अर्ज करु शकतात. शासकीय योजनांसाठी अर्ज करु शकतात. त्याच प्रमाणे पाईप लाईन अनुदान योजना ही योजनेसाठी देखील शेतकरी या महाडीबीटीच्या वेबसाईटवर अर्ज करुन लाभ घेऊ शकतील.  PVC Pipe Scheme

पाईप लाईन योजनेसाठी अर्जदाराची आवश्यक पात्रता

 • अर्जदार भारताचा नागिरक असावा.
 • अर्जदाराची शेती किमान 2 एकर पेक्षा जास्त असावी
 • शेतीविषयक सर्व कर योग्य वेळी केलेली असावी
 • शेतीसाठीच्या पाण्याचा स्त्रोत अर्जदाराच्या स्वतःच्या जमिनीत असावा.

पाईप लाईन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • रेशनकार्ड
 • सातबारा उतारा आणि 8 अ प्रमाणपत्र
 • शातीच्या परिसरात पाणी उपलब्ध असल्याचा दाखला
 • पाईप खरेदी केल्याचे बिल
 • बँकेच्या खात्याचा तपशील
 • आधारकार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबरला लिंक केलेले असावे

पाईप लाईन अनुदान योजनेअंतर्गत असा करा ऑनलाईन अर्ज

 • सर्व प्रथम तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन महाडीबीटीच्या वेबसाईटवर जा. https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
 • Mahadbt पोर्टलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला रजीस्टर करणे आवश्यक आहे. PVC Pipe Scheme
 • तुमचा मोबाईल आणि ईमेल आयडी टाकून तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवर तुमचे नाव रजीस्टर करुन घेऊ शकता. 
 •  रजीस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा लॉगीन करताना Applicant login here-Mahadbt अशी लिंक तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
 • त्यानंतर तुमचा  युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉगीन करा.
 • तुमच्या रजीस्टर केलेल्या मोबील नंबरवर  OTP येईल तो तेथे भरा
 • आता महाडीबीटी वेब पोर्टल तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन झालेले असेल.
 • या पोर्टलवर तुम्हाला विविध योजना दिसतील त्यातील पाईप लाईन अनुदान योजना यावर  क्लिक करा.
 • तालुका गाव शहर सर्वेक्षण क्रमांक किंवा गट क्रमांक याविषयी संपूर्ण माहिती  काळजीपुर्वक भरा.
 • योजनेसंदर्भात माहिती देताना सिंचन साधने आणि सुविधा निवडा. तुम्हाला वापरात येणारे पाईप्स निवडा आणि उपघटकमध्ये पाईप्सची कंपनी आणि प्रकार निवडा.
 • तुम्हाला शेतातील पिकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी किती मीटर पाईप हवे आहेत त्यासंदर्भात आकडा टाका.
 • संपूर्ण माहिती भरुन झाल्यानंतर सबमीट बटनावर क्लिक करा. आणि तुमचा अर्ज सबमीट करा.

पाईप लाईन अनुदान योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे

        शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेली पाईप लाईन अनुदान योजना म्हणजे अत्यंत लाभदायक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होणार आहेत ते आपण पाहूया.

 • शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकासाठी पाणी पोहोचवणे सोपे होणार आहे.
 • पाईप लाईन अनुदान योजनेमार्फत शेतकऱ्यांना तब्बल 50% अनुदान देण्यात येत आहे.
 • शेतीसाठी केवळ जलस्त्रोत असून उपयोग नसतो तर ते पाणी पिकांपर्यंत पोहोचवणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी ही योजना अत्यंत मदतगार ठरणार आहे.
 • शेतातील पिक वाढण्यासाठी पाईप लाईन अनुदान योजना फायदेशीर ठरणार आहे.