Rare 1926 Macallan whiskey: 1926 सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीचा लिलाव कोटीमध्ये | या कारणामुळे ही व्हिस्की आहे एवढी महाग

Rare 1926 Macallan whiskey

Rare 1926 Macallan whiskey पाश्चात्य देशात व्हिस्कीला अत्यंत महत्व आहे. तेथील घरांमध्ये व्हिस्कीच्या जुन्या बॉटल्स घरात सजवून ठेवल्या जातात. ते त्यांची श्रीमंती दाखवण्याचे देखील लक्षण मानले जात आहे. व्हिस्की म्हणजेच मद्य. हेच मद्य अनेक वर्षांपासून साठवून ठेवल्यास मद्यप्रेमी  त्यासाठी लाखो रुपये खर्च करायला तयार असतात.  

दुर्मिळातील दुर्मिळ मद्य खरेदी करण्यासाठी आतापर्यंतची सर्वाधिक बोली लंडनमध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी लावण्यात आली.  जगातील सर्वात महाग आणि सर्वात जुनी म्हणजे 60 वर्षे जुनी असलेली ही व्हिस्की एका लिलावात ठेवण्यात आली होती. त्यावेळी एका व्यक्तीने खरेदी करताना अत्यंत मोठ्या किंमतीत ही दुर्मिळ म्हणजेच 1926 सालची मॅकलन व्हिस्की खरेदी केली आहे. त्याबद्दल आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. Rare 1926 Macallan whiskey

source – thespiritsbusiness

मॅकलन व्हिस्कीला बनण्यासाठी किती कालावधी लागतो?

       जगातील सर्वात महाग व्हिस्की म्हणून नावारुपाला आलेल्या या मॅकलन व्हिस्कीला मॅच्युअर व्हायला 60 वर्षं लागली. सन 1926 मध्ये तयार करुन एका बॅरलमध्ये या व्हिस्कीला ठेवण्यात आले होते. त्यानंतर सन 1986 मध्ये या व्हिस्कीला बाटलीबंद करण्यात आले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिस्कीच्या फक्त 40 बाटल्या बनविण्यात आल्या होत्या. Rare 1926 Macallan whiskey

मॅकलन व्हिस्कीच्या त्या 40 बाटल्या कोणाकोणाला देण्यात आल्या?

तब्बल 60 वर्षे बॅरलमध्ये भरुन ठेवण्यात आलेल्या या मॅकलन व्हिस्कीच्या केवळ 40 बाटल्या भरण्यात आल्या. या भरलेल्या 40 बाटल्यापैकी काही बाटल्या या  मॅकलन कंपनीच्या टॉप क्लायंट्सला भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. आणि काही बाटल्यांचा संच करुन ठेवण्यात आला होता. त्यापैकीची आत्ता लिलावात 22 कोटीला खरेदी करण्यात आलेली एक बॉटल आहे. असे सांगण्याच येते.

1926 सालच्या मॅकलन व्हिस्कीची लिलावात किती किंमत लावण्यात आली?

source – thespiritsbusiness

लंडन मध्ये पार पडलेल्या एका लिलावात 1926 सालच्या मॅकलन व्हिस्कीची एका बाटली चक्क 2.7 मिलियन डॉलरला म्हणजेच भारतीय रुपया मध्ये सांगायचे झालेच तर 22 कोटी 50 लाख रुपयांना एक बाटली विकली गेली आहे. म्हणूनच जगातील सर्वात महाग अशी या व्हिस्कीची ओळख निर्माण झाली आहे.

याआधी देखील  २०१९ मध्ये मॅकलन व्हिस्कीची एक  बॉटल १.८६ मिलियन डॉलर किंमतीला विकण्यात आली होती. त्यावेळी देखील या लिलावाने आधिच्या लिलावाच्या वेळी ठरलेल्या मॅकलन व्हिस्कीच्या एक  बॉटलच्या किंमतीचा विक्रम मोडला गेला होता.

Rare 1926 Macallan whiskey कोणत्या कंपनीने मॅकलन व्हिस्कीचा लिलाव केला?

लंडन येथील सॉथबे या कंपनीने  मॅकलन व्हिस्कीचा लिलाव केला.  मॅकलन 1926 सिंगल मॉल्ट ही व्हिस्की जगातील सर्वांत जास्त मागणी असलेली व्हिस्की आहे त्यामुळे सॉथबे कंपनीसाठी देखील हे मानाचे आणि जबाबदारीचे काम होते.

सोथबीचे प्रमुख असलेल्या जॉनी फॉवले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “1926 सालची मॅकलन व्हिस्की  बोली लावणाऱ्यां आणि कलेक्शन करु पाहणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत अवडीची व्हिस्की आहे.  चार वर्षांआधी  अशाच पद्धतीने आधिचे विक्रम मोडत या व्हिस्कीने जगातील महाग व्हिस्की असण्याचा मान मिळवला होता. म्हणूनच पुन्हा एकदा बोलीसाठी ही व्हिस्की आणण्यास मी खूप उत्सूक होतो. पुन्हा एकदा इतिहास घडल्याने मी अत्यंत आनंदी आहे.”

व्हिस्की पिण्याचे फायदे

व्हिस्की म्हणजे ज्याला आपण मद्य असे म्हणतो, तो फळांचा रस असतो, खरं तर आपल्या शास्त्रांमध्ये जांभूळ, द्राक्षे, काजू या फळांचा रस काढून अनेक दिवस साठवून ठेवले जाई आणि तो रस शरीरातील विविध आजारांसाठी औषध म्हणून वापरात आणला जाई. हेच पाश्चात्य देशात केले जाते, केवळ तिथे हवामान थंड असल्याने त्याला मद्य, दारु असे नाव देण्यात आले आहे. पण या व्हिस्की पिण्याचे अनेक फायदे आहेत,

  • व्हिस्कीमध्ये हृदयाचे आरोग्य वाढवणारे घटक असतात. व्हिस्कीमुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • व्हिस्कीमध्ये अँटिऑक्सिडेंट इलाजिक ऍसिड असते, जे कॅन्सच्या पेशींशी लढते.
  • व्हिस्कीमुळे मेंदूचे चलन सुधारते आणि डिमेन्शिया, अल्झायमरसारखे मेंदूचे आजारांचा धोका कमी होतो,
  • व्हिस्कीच्या एका शॉटमुळे शरीरातील सर्व अवयवांमध्ये रक्कप्रवाह वाढतो.

व्हिस्की  प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल तयार होण्यापासून थांबते आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.