SBI Business loans: SBI कडून छोट्या व्यवसायांसाठी मिळणार 25 लाखांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या सविस्तर!

SBI Business loans

SBI Business loans: तुम्ही एक लहान व्यवसाय करत असाल असाल आणि आता तुम्ही तुमचा छोटा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असल्यास आणि त्यासाठी पैशांची गरज असल्यास, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आणला आहे. छोट्या व्यवसायांसाठी SBI सरलीकृत लघु व्यवसाय कर्ज योजना ऑफर करत आहे, ज्यामुळे उद्योजकांना उत्पादन किंवा सेवा-संबंधित गोष्टींसाठी 25 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवता येणार आहे. ही योजना नक्की काय आहे आणि या योजनेअंतर्गत कर्ज कसे मिळवायचे याबद्दल आता आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. SBI Business loans

जर तुम्ही लहान किंवा मध्यम व्यवसाय करणारे व्यावसायिक असाल किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता तुम्हाला त्यासाठी पैशांची कमतरता भासणार नाही.

देशातील कॉर्पोरेट जगतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक म्हणजे SBI बँकेची ओळख आहे. ही बँक अनेक प्रकारच्या कर्ज योजनांअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देते जसे – गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज, SBI व्यवसाय कर्ज आणि इतर अनेक प्रकारचे कर्ज देखील या बँकेद्वारे उपलब्ध करून दिले जातात.

SBI ची व्यवसाय कर्ज योजना ही एक अतिशय लोकप्रिय कर्ज योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही नवीन व्यवसायासाठी कमी व्याजदरावर कर्ज घेऊ शकता. SBI व्यवसाय कर्जाचा व्याजदर 11.05% पासून सुरू होतो. याशिवाय कर्ज परतफेड कालावधी निवडण्याचा पर्याय देखील या बँकेद्वारे उपलब्ध करून दिला गेला आहे.

कर्जाची रक्कम आणि संपार्श्विक सुरक्षा | Loan amount and collateral security | SBI Business loans
सरलीकृत लघु व्यवसाय कर्ज योजनेंतर्गत, SBI किमान 10 लाख रुपयांपासून कमाल 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला संपार्श्विक सुरक्षा प्रदान करणे आवश्यक आहे, जी सामान्यत: कर्ज मूल्याच्या 40% इतकी असते.

व्याज दर | Interest rate | SBI Business loans
SBI ने त्यांच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम एंटरप्राइझ कर्जाचे फ्लोटिंग रेट, एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) शी जोडले आहेत. लहान व्यवसाय कर्जाचे व्याजदर कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतात. SBI च्या MSME कर्ज EBLR नुसार, व्याजदर 11.05 टक्क्यांपासून सुरू होऊ शकतात. या कर्ज योजनेसाठी परतफेड कालावधी 60 महिन्याचा सेट केला आहे, म्हणजेच हा परतफेड कलावधी 5 वर्षांपर्यंतचा आहे.

प्रक्रिया शुल्क | processing fee
सरलीकृत लघु व्यवसाय घ्यायचे असेल तर तुमची कर्जासाठीची अर्जप्रक्रिया करण्यासाठी, SBI तुमच्याकडून 7500 रुपये प्रक्रिया शुल्क आकारते. या शुल्कामध्ये प्रक्रिया शुल्क, EM शुल्क, दस्तऐवजीकरण शुल्क, तपासणी, वचनबद्धता शुल्क आणि प्रेषण शुल्क या गोष्टी समाविष्ट आहेत.

पात्रता निकष | Eligibility Criteria
SBI द्वारे देण्यात येणाऱ्या या व्यवसाय कर्जासाठी पात्र होण्यासाठी, तुम्ही काही पात्रता निकष पूर्ण करायला पाहिजेत. त्यासाठी पात्रता निकष म्हणजे, तुम्ही ज्या ठिकाणाहून कर्जासाठी अर्ज करत आहात त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय किमान 5 वर्षांसाठी कार्यरत असावा. याव्यतिरिक्त, तुम्ही किमान दोन वर्षे चालू खाते ठेवले पाहिजे, आणि खात्यातील मागील 12 महिन्यांची सरासरी मासिक शिल्लक ही 1 लाख रुपये असावी.

SBI Business loans आवश्यक कागदपत्रे | Important documents


विशिष्ट प्रकारच्या कर्जाच्या आधारावर SBI व्यवसाय कर्जासाठी कागदपत्रांची आवश्यकता बदलू शकते. तरीही पुढे काही सामान्य कागदपतरांबद्दल माहिती देण्यात आली आहे, आणि हे कागदपत्र तुम्हाला कर्जासाठी अर्ज करताना आवश्यक असतील:

  1. पासपोर्ट आकाराच्या फोटोसह संपूर्ण व्यवस्थित भरलेला अर्ज
  2. अर्जदारासाठी KYC (तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या) कागदपत्रे, जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर आयडी कार्ड आणि युटिलिटी बिल
  3. मागील वर्षाचे बँक स्टेटमेंट
  4. त्यासोबतच वित्तीय संस्थेला लागणारी इतर कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे