SBI Youth for India Fellowship 2024: ग्रॅज्युएट आहात? तर मग थेट SBI बँकेत नोकरी मिळवा! लगेचच करा अर्ज!

SBI Youth for India Fellowship 2024: SBI ने Youth for India Fellowship 2024 लाँच केली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मुळात, हा एक फेलोशिप प्रोग्राम आहे, त्यामुळे उमेदवार केवळ मर्यादित कालावधीसाठीच SBI सोबत काम करू शकतात.

SBI Youth for India Fellowship 2024 साठी अर्ज कसा करावा? कोणते उमेदवार पात्र असणार आहेत? निकष काय असणार आहेत? ही fellowship कशी मिळेल? उमेदवारांची निवड कशी केली जाते? असे सर्व महत्त्वाचे विषय आम्ही या लेखात पुढे नमूद केलेच आहेत. कृपया ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार अर्ज सबमिट करा.

बँकेचे नाव – एसबीआय बँक
जॉब प्रकार – फेलोशीप
पद नाव – फेलोशिप प्रोग्राम
कालावधी – 13 महिने
अनुभव – 0 वर्षे
कामाचे ठिकाण – संपूर्ण भारतात
वेतन – 17,000 रुपये प्रति महिना + 70,000 रुपये
अर्ज प्रक्रिया – ऑनलाइन अर्ज पद्धत

SBI Youth for India Fellowship 2024 पात्रता निकष | Eligibility Criteria

पेड एसबीआय इंटर्नशिपसाठी म्हणजेच एसबीआय युथ फॉर इंडिया फेलोशिपसाठी, बँकेने काही पात्रता निकष ठरवून दिले होते. त्यानुसार, हे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची फेलोशिपसाठी निवड केली जाईल.

उमेदवार भारतीय किंवा भारतीय परदेशी नागरिक असणे आवश्यक आहे.
या फेलोशीप साठी भूतान आणि नेपाळमधील उमेदवारही पात्र आहेत.
21 ते 32 वर्षांच्या दरम्यान उमेदवाराचे वय असावे.
उमेदवाराने ग्रॅज्युएशन पर्यंत अभ्यास पूर्ण केलेला असावा.

SBI Youth for India Fellowship 2024 details

पगार दरमहा 15,000 रुपये आहे.
1000 प्रति महिना transportation/ प्रवासाचा खर्च देण्यात येईल.
प्रकल्पाशी संबंधित खर्चासाठी रु. 1000 दिले जातील.
फेलोशीप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर रु.70,000 दिले जातील.
शिवाय, आरोग्य आणि अपघात विमा काढला जातो.

SBI Youth for India Fellowship 2024 अर्ज फॉर्म | Application form

SBI Youth for India Fellowship साठी उमेदवार ऑनलाइन नोंदणी करू शकतात, यासाठीची लिंक activate करण्यात आली आहे.
सर्वप्रथम, तुम्हाला SBI Youth for India च्या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
वेबसाइटवर तुम्हाला “Apply” वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर SBI Youth for India फेलोशिप फॉर्म तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला तो भरावा लागेल.
फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज भरावा.
आवश्यक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, त्यामुळे योग्य सूचनांचे पालन करा.
एकदा फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर, त्याचे व्हेरिफिकेशन करून नंतर फॉर्म सबमिट केला पाहिजे.

ऑनलाइन अर्ज करा (https://change.youthforindia.org/catalogue/388/sbi-youth-for-india-fellowship-2024-25)

SBI Youth for India Fellowship 2024 निवड प्रक्रिया | Selection Process

SBI Youth for India Fellowship साठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यात होते. दोन्ही टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना SBI कडून शिष्यवृत्ती मिळेल.

स्टेप 1 – तुम्ही ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म भरावा लागेल आणि ऑनलाइन व्हेरिफिकेशन करून हा फॉर्म सबमिट करावा लागेल.
स्टेप 2 – दुसऱ्या टप्प्यात, उमेदवारांची ऑनलाइन assesment द्वारे निवड केली जाते आणि यामधे उत्तीर्ण झाल्यास मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते. या पदासाठी उमेदवारांची योग्यता तपासण्यासाठी वैयक्तिक मुलाखत घेतली जाते. शैक्षणिक प्रशिक्षणाव्यतिरिक्त, व्यावसायिक अनुभव देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

SBI Youth for India Fellowship 2024 साठी कोण पात्र आहे?
ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले उमेदवार SBI Youth for India Fellowship 2024 साठी अर्ज करू शकतात. प्रवेशाच्या पात्रतेबाबत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर बाबीं सोबतच, इतर माहिती देखील समाविष्ट असून त्यासाठी कृपया वरील लेख काळजीपूर्वक वाचा.

SBI Youth for India Fellowship 2024 साठी अर्ज कसा करावा?
एसबीआय युथ फॉर इंडिया फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरणे आवश्यक आहे. उमेदवारांना वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल आणि सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल.

SBI Youth for India Fellowship 2024 साठी मासिक वेतन किती आहे?
एसबीआय युथ फॉर इंडिया फेलोशिप इंटर्नसाठी स्टायपेंड संपूर्ण ग्रांट स्टायपेंडसह प्रति महिना 17,000 रुपये आहे. ही fellowship पूर्ण झाल्यावर 70,000 रुपयांची रक्कम देखील दिली जाणार आहे.