Solar Mobile Charger:  सोलर मोबाईल चार्जरच्या मदतीने सूर्यप्रकाशावर करता येणार मोबाईल चार्जिंग.

Solar Mobile Charger वीजनिर्मितीचा मुबलक पुरवठा आणि इंधनाचे वाढते दर यामुळे सूर्य प्रकाशाच्या वापराने मानवी गरजा भागवण्यावर भर दिला जात आहे. विज्ञानाच्या मदतीने या सर्व गोष्टी अगदी सहज आणि सोप्या आहेत. सोलर वॉटर हीटर, सौर बंब, सौरचुल, सोलर कुकर, सौर कंदील, सौर पथदिवे असे एक ना अनेक सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वस्तू बनविण्यात आल्या आहेत. ज्यामुळे विजेचा वापर कमी झाला असून विजेच्या वापराला एक पर्याय प्राप्त झाला आहे.

मोबाईल ही मुलभूत गरज बनली आहे

आजच्या आपल्यी जीवनशैलीमध्ये मोबाईल ही आपली मूलभूत गरज बनली आहे. मोबाईलशिवायचे जगणे आपण विचारच करु शकत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला मोबाईल हातात हवाच असतो. मग या मोबाईलची बॅटरी संपली तर मात्र पंचाईत होते अशावेळी वीजेच्या मदतीने मोबाईल चार्ज करावा लागतो किंवा मग पॉवर बँक च्या मदतीने मोबाईल चार्ज केला जातो. परंतू हल्ली लोड शेडींगमुळे अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत केला जातो त्यामुळे मोबाईल चार्ज करणे कठीण होते, त्यासाठी सोलार मोबाईल चार्जरचा वापर करता येऊ शकतो. आजच्या लेखामध्ये आपण सोलर मोबाईल चार्जरचे फायदे समजून घेणार आहोत. Solar Mobile Charger

सोलर मोबाईल चार्जर म्हणजे काय?

घरी वीज नसेल तर सौर ऊर्जेच्या मदतीने मोबाईल चार्ज करण्याचे यंत्र म्हणजे सोलर मोबाईल चार्जर होय. या उपकरणाला वीज लागत नाही. आणि जसा आपण वीजेवर मोबाईल चार्ज करतो तसाच तो सूर्य प्रकाशाच्या मदतीने मोबाईल चार्ज करायचा असतो फक्त सौर ऊर्जेवर चालणारा मोबाईल चार्जर विकत घ्यावा लागतो. Solar Mobile Charger

सोलर चार्जरने मोबाईल कसा चार्ज करायचा?

सोलर चार्जरने मोबाईल कसा चार्ज करायचा असा अनेकांना प्रश्न पडला असेल. त्याचं उत्तर आम्ही देतो. तुमच्या घराच्या छतावर किंवा टेरेसवर जाऊन मोबाईल चार्ज करु शकतो. यासाठी फक्त आणि फक्त सूर्य प्रकाशाची गरज असते. यामध्ये केवळ वन टाईन पैसे खर्च करण्याची गरज असते. ती म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारा चार्जर खरेदी करताना. बाकी सौर ऊर्ज तर आपल्याला मोफतच मिळत असते त्याच्या मदतीने आपण आपला मोबाईल चार्ज करायचा असतो. Solar Mobile Charger

सोलर मोबाईल चार्जरची किती किंमत असते?

ऍमेझॉन सारख्या प्रसिद्ध वेबसाईटवर पाहचा सोलर मोबाईल चार्जरची किंमत 500/- ते 5000/- रुपयांपर्यंत असल्याचे दिसून येते. यामध्ये विविध कंपन्यांचे सोलर चार्जर उपलब्ध आहेत. प्रत्येक सोलर चार्जरच्या बनावटीप्रमाणे त्याची किंमत ठरत असते. Solar Mobile Charger

सोलर मोबाईल चार्जर वापरण्याचे फायदे

सोलर मोबाईल चार्जर वापरण्याचे अनेक फायदे आहेत. ते फायदे पुढीलप्रमाणे

  • वीजेचा अतीरिक्त वापर टाळता येतो.
  • कोणत्याही अवास्तव खर्जाशीवाय मोबाईल चार्ज करता येतो
  • सौर ऊर्जा आपल्याला वर्षाचे 12ही महिने मिळत असते त्यामुळे कधीही कोणत्याही वेळी दिवसा आपण  मोबाईलची बॅटरी संपल्यानंतर रिचार्ज करु शकतो.
  • हे उपकरण वापरताना कोणताही जीवाला धोका नाही. कारण वीजेचा वापर करताना आपल्याला शॉक लागण्याची भीता असते.
  • सौर ऊर्जेच्या वापरामुळे आपण एकप्रकारे पर्यावरणाला राखण्याचे काम करीत असतो.
  • सौर ऊर्जेवर चालणारा  मोबाईल चार्जर हा वजनाने हलका असतो त्यामुळे तो सहज प्रवासात वापता येतो.

सौर ऊर्जेवर चालणारा मोबाईल चार्जरच्या मदतीने मोबाईल सुर्य प्रकाशात येताच सहज चार्ज होऊन जातो. कोणत्याही प्रकारे अधिक मेहनत करावी लागत नाही. Solar Mobile Charger

विज्ञानाच्या मदतीने आपण पर्यावरण पुरक जीवनाकडे वाटचाल करीत आहोत. त्यातील एक सर्वात मोठा बदल म्हणजे सौर ऊर्जेचा वापर आणि या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करणे. आपण जास्तीत जास्त प्रमाणात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर केल पाहिजे आणि वीजेचा अवास्तव वापर टाळला पाहिजे. सौर ऊर्जेचा वापर ही आता काळाजी गरज बनत चालली आहे. Solar Mobile Charger