Scholarship 2023 : स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. असे काही विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत मात्र त्यांच्याकडे पुढील शिक्षण करण्यासाठी पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्तीची योजना आहे. त्यामुळे विद्यार्थी पुढील शिक्षण पूर्ण करू शकतील.
विद्यार्थ्यांसाठी खास शिष्यवृत्तीची योजना आहे. जिचं नाव डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत शिष्यवृत्ती (2023-24) असं आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कुठे करायचा? तसेच या शिष्यवृत्तीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट
अनेक विद्यार्थी हुशार असतात. परंतु, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे पैसे नसतात. (Dr. Panjabrao Deshmukh Scholarship Yojana) अशा अनेक अडचणी येतात. विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे. (government scholarship scheme)
या तारखेपर्यंत अर्ज करा
डॉ. पंजाबराव देशमुख सारथी देशांतर्गत शिष्यवृत्ती 2023-24 साठी 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. सारथी अंतर्गत 30 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात अली आहे. विद्यार्थ्यांनी यासाठी आवश्यक कागदपत्रांसह खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करावा. (pm scholarship yojana)
शिष्यवृत्तीची पात्रता
देशातील नामांकित 200 शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश घेतलेल्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती या उपक्रमांतर्गत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
मूळ अर्ज व कागदपत्रे (Hardcopy) सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचावी.
शिष्यवृत्ती करिता अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://admin.sarthi-maharashtragov.in/auth/login
शिष्यवृत्तीची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://shorturl.at/IT056
स्कॉलरशिपच्या अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://shorturl.at/mGXY7
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 https://sarthi-maharashtragov.in/
डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:
सर्वप्रथम म्हणजे सर्व अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे कायदेशीर रहिवासी असणे गरजेचे आहे.
अर्जदाराच्या संपूर्ण कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख ते 8 लाख रुपयांच्या मर्यादेत असले पाहिजे. अर्जदारांना त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
जे अर्जदार या शिष्यृत्तीसाठी अर्ज करणार आहेत त्या सर्व अर्जदारांचे पालक मजूर म्हणून नोंदणीकृत असले पाहिजेत.
ज्यांना या शिष्यृत्तीसाठी अर्ज करायचा आहे अश्या अर्जदाराच्या कुटुंबाकडे फारच कमी शेती असेल किंवा अजिबातच शेती नसेल तरी देखील अशा कुटुंबातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तथापि, त्यांनी कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि जमीन नोंदणी प्रमाणपत्र दोन्ही प्राप्त करणे आवश्यक आहे आणि ते त्यांच्या अर्जासह सबमिट करणे देखील अत्यंत आवश्यक आहे.
पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेसाठी, अर्जदारांनी रहिवासी प्रमाणपत्र प्रदान करणे आवश्यक आहे.
2010 नंतर केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) मधे प्रवेश घेतलेले विद्यार्थीच यासाठी पात्र आहेत. याचा अर्थ जे विद्यार्थी केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतल्यानंतर जागा अल्लॉटमेंट पत्र देण्यास सक्षम असतील तेच विद्यार्थी अर्ज करू शकतात.
अर्जदारांनी वर्षभरात किमान 50% किंवा त्याहून अधिक उपस्थिती असल्याची खात्री केली पाहिजे.
पंजाबराव देशमुख वसतिगृह अनुदान योजनेचा प्रत्येक कुटुंबातील फक्त दोन लाभार्थी लाभ घेऊ शकतात.
ही योजना व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा तांत्रिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे.
सेल्फ फायनान्स सारख्या कोणत्याही योजनेद्वारे खाजगी स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासाठी पात्र नाहीत.
अर्जदारांनी त्यांचा बँक खाते क्रमांक त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे.
इतर शिष्यवृत्ती योजनांप्रमाणेच, जर एखाद्या अर्जदाराला या योजनेंतर्गत अनुदान मिळाले, तर ते त्याच वर्षी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत. जर त्यांनी असे केल्यास त्यांना उपलब्ध विविध शिष्यवृत्ती पर्यायांमधून पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची निवड करणे आवश्यक आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना 2023 साठी पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी वरील सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.