sim card checks online: आजच्या डिजिटल युगात मोबाईलशिवाय आयुष्य जवळपास अशक्य आहे. प्रत्येकाकडे किमान एक तरी मोबाईल नंबर असतोच, आणि अनेक जण दोन-तीन वेगवेगळ्या कंपन्यांची सिमकार्ड्स वापरतात. पण कधी विचार केला आहे का, तुमच्या नावावर आणखीही काही सिम कार्ड सक्रिय असू शकतात, ज्या बद्दल तुम्हाला काही कल्पनाच नसेल! समजा, कोणीतरी तुमच्या नावाने सिमकार्ड घेतले आणि त्याचा गैरवापर केला, तर? आणि हे तुम्हाला कळायच्या आधीची तुम्ही अडचणीत आलात तर?
आजकाल अनेक फसवणुकीच्या घटनांमध्ये असे दिसून येते की, लोकांच्या नावाने त्यांच्या नकळत सिमकार्डची नोंदणी केली जाते आणि त्याचा वापर बेकायदेशीर कृत्यांसाठी केला जातो. हे सिमकार्ड कोणतेही गुन्हेगारी स्वरूपाचे काम करण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि त्याची जबाबदारी शेवटी तुमच्यावर येऊ शकते. त्यामुळे, स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि तुम्ही भविष्यात कोणत्याही अडचणीत सापडू नये म्हणून, तुमच्या नावावर किती सिमकार्ड (SIM Card Info) आहेत हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे कसे तपासाल? | How to Check Sim Ownership
सरकारने यासाठी Sanchar Saathi नावाची अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही सहज तपासू शकता की, तुमच्या नावावर किती सिमकार्ड्स नोंदणीकृत आहेत.
- सर्वप्रथम https://www.sancharsaathi.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
- मग, तुम्हाला एक OTP मिळेल, तो टाकून Validate वर क्लिक करा.
- लगेचच स्क्रीनवर तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले सर्व मोबाईल नंबर दिसतील.
- त्यात कोणता नंबर तुमच्या माहितीतला नाही किंवा तुम्ही वापरतच नाही, तो डिऍक्टिवेट करा.
तुमच्या नावावर कोणी सिम वापरत असेल तर?
कधी कधी असे घडते की, तुम्ही घेतले नसलेले सिमकार्डसुद्धा तुमच्या नावावर नोंदवलेले असते. जर तुम्हाला असे काही आढळले, तर तुम्ही लगेच त्या सिमविषयी तक्रार करू शकता. यासाठी सगळ्यात आधी टेलिकॉम कंपनीला संपर्क साधून ते सिमकार्ड बंद करण्याची विनंती करा. तसेच, तुम्हाला एखाद्या प्रकारची शंका येत असेल, तर जवळच्या पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करणे गरजेचे ठरणार आहे. (Analysis of SIM card numbers)
सिमकार्डचा गैरवापर
फसवणूक करणाऱ्या टोळ्या दुसऱ्याच्या आधारकार्डचा वापर करून नवीन सिमकार्ड खरेदी करतात. मग त्या सिमचा वापर बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी, बनावट कॉल करून फसवणूक करण्यासाठी किंवा ऑनलाईन फ्रॉड करण्यासाठी केला जातो. हे सिमकार्ड जर तुमच्या नावावर असेल आणि तुम्हाला त्याबद्दल माहितीच नसेल, तर भविष्यात तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता.
याशिवाय, काही फ्रॉड लोकं KYC अपडेट करण्याच्या नावाखाली तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करून सिमकार्ड घेतात आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील करतात. म्हणूनच, सतर्क राहा आणि वेळोवेळी तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे तपासून घ्या.
मोबाईल नंबर हरवू नका, नाहीतर मोठे नुकसान होईल!
आजच्या काळात आधारकार्ड आणि मोबाईल नंबर हे एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही दोन किंवा अधिक सिमकार्ड वापरत असाल आणि त्यापैकी एक नंबर हरवला गेला असेल किंवा बंद केला असेल, तर तुम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
जर तुमचा आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर हरवला, तर बँक व्यवहारांसाठी लागणारे OTP मिळणार नाही. आधारशी संबंधित कोणतीही प्रक्रिया पूर्ण करणे अवघड होईल आणि काही शासकीय योजनांचा लाभ घेणेही यामुळे कठीण होईल. त्यामुळे, तुमचा महत्त्वाचा मोबाईल नंबर कायम चालू ठेवा आणि सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा.
सुरक्षितता ही आपल्याच हातात आहे. तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत याचा नियमितपणे आढावा घ्या. जर तुम्हाला कोणतेही अनोळखी सिमकार्ड आढळून आले तर लगेचच योग्य ती कारवाई करा. अन्यथा, भविष्यात कोणतीही फसवणूक झाली, तर त्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते.