Manoj Jarange news गेली अनेक वर्षे मराठा आरक्षणाचा निर्माण झालेला तिढा सुटल्याचे वारे वाहताच आता पुन्हा एका मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या अधिवेशनात शासनासमोर मराठा आरक्षणाचे बिल ठेवून ते पास करुन घेण्याचा महाराष्ट्रातील शिंदे, फडणवीस, पवार या महाआघाडी सरकारचे धोरण दिसून येत आहे. जर का अधिवेशनात मराठा आरक्षणाबद्दल बिल पास झाले तरी हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रभर मराठा नोंदी शोधण्याचे सर्वे सुरु करण्यात आले आहेत. या संदर्भातील अधिक माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. Manoj Jarange news
मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी OBC आरक्षणाला धक्का न लावण्यासंदर्भात आणि OBC समाजावर अन्याय होऊ नये या संदर्भात भूमिका अधिक आक्रमक केल्याचे दिसून येत आहे. आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी एका जाहीर सभेतच केल्यामुळे त्यावरून सत्ताधारी पक्षांमध्ये बैठकसत्र सुरू झाले होते. आणि मराठी आरक्षणाला पुन्हा एकदा चळवळीचे स्वरुप येते की काय असे दिसताच, मराठा आरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केलं आहे. Manoj Jarange news
तुमची कुणबी नोंद आहे का? ही नोंद कुठे तपासायची?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणातील मान्य केल्या होत्या मागण्या
मराठा आरक्षण हे आता तब्बल 40 वर्षे सुरु आहे. आणि त्याचे यश म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 27 जानेवारी 2024 रोजी वाशीमध्ये पोहोचलेल्या मराठा आंदोलकांसमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबातच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. तसेच, इतर कोणत्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणले. एकीकडे मराठा आरक्षणाला यश मिळत असताना सोशल मीडियावरून मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे नोमका काय फायदा झाला? असा प्रश्न काही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन विचारण्यात येत आहे. त्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषद बोलावून उत्तर दिले. त्यात ते असे म्हणाले की,
“काहींनी सत्ताधारी-विरोधकांकडून सुपारी घेतलीये” असे म्हणाले मनोज जरांगे पाटील. Maratha Aarakshan
सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही राजकीय नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली घेतल्याचे दिसून येत आहे. असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. महाराष्ट्रातील काही जणं सरकार व विरोधी पक्षांची सुपारी घेऊन सलग बोलत राहतात. आंदोलनातून काय मिळालं, काय नाही मिळालं असे प्रश्न ते सोशल मीडियावर विचारत राहतात. पण हा लढा त्यांच्यासाठी नाहीये. हा लढा माझ्या मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलत आहेत त्यामागे त्यांचा हेतू आहे की मराठा समाजातील माझ्या बांधवांच्या मनात त्यांना संभ्रम निर्माण करायचा आहे. हे सोशल मिडियावर उटसूट काहीही बोलणारे जर इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्याने दिला. Manoj Jarange news
पुढे जरांगे पाटील असं ही म्हणाले की, “मला बाजूला करण्यासाठी या भेकाडांचे असे प्रयत्न सुरु आहेत. माझे करोडो मराठा बांधव मला सांगत नाहीत तोपर्यंत मी बाजूला हटणार नाही. हे सगळं मी कोणत्याही श्रेयासाठी केलेलं नाही,. इतकेच काय तर हे सोशल मिडियावर ट्रोल करणारे 15-20 जण मराठ्यांच्या जिवावर खाणारे आहेत. गरीब घरातला मुलगा मराठ्यांसाठी लढतोय हिच खरी यांची सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. हा मॅनेजही होत नाही, फुटतही नाही आपलं काय होणार? असा प्रश्न त्यांना पडलाय. मी 10 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंबंधीत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषण करणार आहे” असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. Manoj Jarange news
पुढे ते असंही म्हणाले की, जोपर्यंत कायद्याची योग्य अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. मी कुठेही बसलो, तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतींच्या आत दुसरंच काही ठरवायचं असतं, तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो. पण मी त्यातला नाही, मी लोकांमध्ये गेलो, मागण्या मान्य झाल्याचे सांगत जल्लोष केला. माझ्या मराठी बांधवांच्या चेहऱ्यावरचे आनंदाश्रू पाहिले. हा खरेपणा आहे. असे मराठा आरक्षणातील संघर्षयोद्धा म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. Manoj Jarange news
हिवाळी अधिवेशन कधी पासून?
मराठा आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या अधिवेशनात झाली पाहिजे. इतर मंत्र्यांनी देखील त्याला सहकार्य करावे, अन्यथा मराठे तुम्हाला दरात उभे करणार नाहीत. असंही मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले आहे. आता 15 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या हिवाळी अधिवेशनात नेमका काय प्रस्ताव मांडला जातोय आणि मराठा आरक्षणासंबंधीत या बिलाला कोण कोण नेते सहकार्य देतायत हि बात पाहण्यासारखी असणार आहे. Manoj Jarange news