UCO bank recruitment तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? मग तुम्ही UCO बँकेने जाहीर केलेल्या पदभरतीची संधी सोडू नका. कारण या वेळी कोणतीही परीक्षा न घेता युको बँक अर्ज करणाऱ्यांना थेट नोकरी देणार आहे. कोणत्याही प्रकारे उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती आम्ही देत आहोत. लेख पूर्ण वाचा आणि आजच अर्ज भरा.
UCO bank recruitment कोणत्या पदासाठी आणि किती पदे भरण्यात येणार आहेत.
युको बँकेकडून इच्छूक उमेद्वारांकडून ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ या पदासाठी अर्ज मागवले जात आहेत. या पदभरती प्रक्रियेतून 127 पदे ही भरली जाणार आहेत. योग्य उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लगेचच या भरतीसाठी अर्ज करावा.
UCO bank recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख?
युको बँकेत सुरु झालेली पदभरती प्रक्रिया ही केवळ 127 पदासाठी असून येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 27 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज युको बँकेकडे पाठवणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्जासोबत उमेदवारांनी कागदपत्रे सबमीट करणे आवश्यक आहे.
युको बँकेतील उमेदवाराची पात्रता काय असावी
- अर्जदार भारताचा नागरिक असावा
- अर्जदाराला संकणकाची संपूर्ण माहिती असावी.
- अर्जदार कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलेला असावा
युको बँकेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड
- पदवीप्राप्त प्रमाणपत्र
- रहिवासाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
युको बँक भरती प्रक्रियेतील अर्जदाराला किती फी भरावी लागणार?
युको बँकेतील भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 800/- रूपये फिस भरावी लागणार आहे. तसेच काही जाती प्रमाणपत्र उमेदवारांना बँकेकडून फिसमध्ये सूट देण्यात आली आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया UCO application process
या भरती प्रक्रियेसाठीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ucobank.com या साईटवर जावे लागेल. तिथेच उमेदवारांना भरती संदर्भातील सर्व माहितीही मिळेल. साईटवरील अर्ज डाऊनलोड करून घ्या. अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवणे अपेक्षित आहे.
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता UCO bank application address
महाव्यवस्थापक, युको बँक, मुख्य कार्यालय, चौथा मजला, एच.आर. विभाग, 10, बीटीएम सारनी, कोलकाता, पश्चिम बंगाल – 700 001.
युको बँकेची माहिती – info about UCO bank
ही भरती प्रक्रिया युको बँकेकडून राबवली जात आहे. युको बँकेतील आजपर्यंतची सर्वात मोठी भरती आहे. युको बँकमध्ये नोकरी करण्याची ही संधी आहे. तुम्ही जर या संधीचा फायदा घेणार असाल तर तुम्हाला युको बँकेबद्दल संपूर्ण माहिती असणे देखील महत्त्वाचे आहे. कारण या थेट भरती प्रक्रियेत तुमची मुलाखत ही घेतली जाणारच आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेद्वारांची मदत व्हावी म्हणून आम्ही तुमच्यासाठी इथे युको बँकेचा इतिहास आणि इतर माहिती सविस्तर पणे मांडत आहोत.
- युको बँक ही एक व्यावसायिक बँक आहे.
- युको बँक पूर्वी युनायटेड कमर्शियल बँक म्हणून ओळखली जात असे
- इसवी सन 1943 मध्ये कोलकाता येथे युको बँकेची स्थापना झाली
- तसेच हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे.
- बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे मूल्यवर्धित बँकिंग पर्याय उपलब्ध करुन देते.
- ज्यामध्ये एनआरआय कर्ज योजनांसाठी आंतरराष्ट्रीय बँकिंग सेवा ठेव योजना आणि मूल्यवर्धित ई-बँकिंग सोल्यूशन्सचा देखील समावेश आहे.
- UCO बँकेची संपूर्ण भारतात तब्बल 34 प्रादेशिक कार्यालये आहेत.
- तसेच सिंगापूर आणि हाँगकाँग या दोन महत्त्वाच्या वित्तीय केंद्रांमध्ये चार परदेशातील शाखांसह बँकेचे आंतरराष्ट्रीय कार्यालये देखील आहेत.
- 2020 मध्ये फॉर्च्युन इंडिया 500 च्या यादीत ते 80 व्या स्थानावर होते.
- 2020-21 या आर्थिक वर्षात युको बँकेचा एकूण व्यवसाय ₹3.24 लाख कोटी
- 31 मार्च 2021 रोजी बँकेतील सरकारी हिस्सा 94.44% इतका होता.
- 2020-21 या आर्थिक वर्षासाठी युको बँकेने 167 कोटीं रुपयांचा निव्वळ नफा केला आहे.