Vihir Anudan Yojana 2023 ४ लाख रु. अनुदानासह मागेल त्याला विहिर योजना… असा करा अर्ज…

Vihir Anudan Yojana 2023

Vihir Anudan Yojana 2023 | मागेल त्याला 4 लाखांची नवीन विहिर अनुदान योजना शासनाने सुरु केली आहे. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा मधून नवीन सिंचन विहिर खोदण्यासाठी शेतकऱ्यांना 4 लाख रुपये एवढं अनुदान मिळणार आहे.

या योजनेसंबंधी शासनाने दि. 4 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय जाहीर केला होता त्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आणखी 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य होणार असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास विभागानं म्हटलेलं आहे. म्हणून त्या उद्देशाने Vihir Anudan Yojana 2023 या योजनेतून पूर्ण करण्याचे ठरविले आहे. विहिर अनुदानासंबंधीत महाराष्ट्र राज्याचा शासन निर्णय खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही पाहू शकता.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202211041907250616.pdf

Vihir Anudan Yojana 2023 योजनेअंतर्गत 4 लाख रुपयांचे अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थातच मनरेगा या योजनेच्या अंतर्गत सिंचन विहिर योजनेचा निर्णय शासनाने लावत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावे, त्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत नवीन सिंचन विहीर योजना राबवली जात आहे. सध्या 2 विहिरीच्या मधील अंतराची जी काही अट होती ती अट सुद्धा आता  राज्य सरकारने रद्द करून त्यामध्ये शिथितला देण्यात आलेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा बदललेला निर्णय म्हणजे 3 लाख रुपयांवरून 4 लाख रुपये अनुदानाला मंजूरी देण्यात आलेले आहे.

मागेल त्याला विहिर योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 चा ऑनलाईन उतारा
  • 8 अ चा ऑनलाईन उतारा
  • सामुदाईक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्यास पंचनामा
  • सामुदाईक विहीर असल्यास सामोपचाराने पानी वापरबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र

नवीन विहीर अनुदान योजना 2023 : लाभार्थ्याची निवड

महाराष्ट्र राज्यात  Vihir Anudan Yojana 2023 या योजनेअंतर्गत कोणाला या योजनेचा लाभ  घेता येणार आहे ते आपण पाहू.

  • इंदीरा आवास योजनेच्या खालील लाभार्थी
  • सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यन्त भूधारणा)
  • अल्पभूधारक शेतकरी (5 एकर पर्यन्त भूधारणा)
  • अनुसूचित जाती, जमाती
  • भटक्या जमाती
  • दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
  • स्री कर्ता असलेले कुटुंबे
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेले कुटुंबे
  • जमीन सुधारण्याचे लाभार्थी

असा करा विहीर नोंदणी अर्ज 2023

Vihir Anudan Yojana 2023  अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा असल्यास त्यांनी शासन निर्णयाच्या दिलेल्या लिंकवर जाऊन  PDF डाऊनलोड करावी. त्या PDF मधील पान क्र. 15 वर दिलेल्या अर्जाची प्रिंट घेऊन त्यात तुमची माहिती भरुन  विचालेल्या कागदपत्रांसह संमतीपत्र भरून गावच्या  ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे.

विहिर अनुदानासंबंधीत महाराष्ट्र राज्याचा शासन निर्णय खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही पाहू शकता.

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202211041907250616.pdf

मागेल त्याला विहिर योजना 2023 पात्र लाभार्थींसाठी सुचना

Vihir Anudan Yojana  या योजनेमध्ये 2023 यावर्षात बदल करण्यात आले आहेत. योजनेच्या लाभार्थींनी पुढील गोष्टी नक्की वाचावे व त्यानुसार पुढील कार्यवाही करावी.   

  • लाभ धारकाकडे किमान 0.40 हेक्टर सलग क्षेत्र असावे. (online दाखल्यासाहित)
  • 2 विहिरीमधील अंतर दीडशे मीटर यांची जी अट ही रद्द केलेली आहे
  • लाभधारकाच्या 7/12 वर विहीरीचे नोंद असू नये.
  • लोकसंख्यानुसार विहीर उद्दिष्टाचे अट रद्द नसेल
  • एका गावात कितीही विहीरी घेता येऊ शकणार आहेत
  • Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 मध्ये 3 लाखा ऐवजी 4 लक्ष रुपये अनुदान केले गेलेले आहे