UPI Payment Rules 2024 भारतात 40 कोटी पेक्षाही जास्त नागरिक यूपीआय वापरकर्ते आहेत. भाजी मार्केट पासून हॉटेलपर्यंत सगळीकडेच आपण मोबाईल वरून पेमेंट करतो त्यामुळे खिशात कॅश नसल्याने नागरिकांना काही फरक पडत नाही. आपल्याला 2023 मध्ये यूपीआय वापरून सोळा लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले पण यासोबत आजकाल करण्याचे प्रमाण सुद्धा वाढलं सायबर क्राईमच्या आकड्यानुसार या 16 लाख कोटींच्या व्यवहारांपैकी 30000 कोटी रुपयांची चोरी केली गेली आता एवढे व्यवहार वाढणार तर चोरीचा प्रमाण सुद्धा वाढणार म्हणूनच ते कंट्रोल करण्यासाठी आणि सिक्युरिटी वाढावी म्हणून यूपीआय वर काही नवीन नियम सुरु करण्यात आले आहे. हे नविन नियम 1 जानेवारी 2024 पासून RBI ने MPCI च्या मार्फत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
युपीआय पेमेंट संदर्भातील 2024 मध्ये लागू करण्यात आलेले 10 नवीन नियम UPI Payment Rules 2024
- तुम्ही न वापरलेले सर्व युपी ॲप्स लॉक होणार आहेत
गुगल पे, फोन पे, पेटीएम, ॲमेझॉन पे, भीम यापैकी कोणताही अँप तुमच्या फोनमध्ये असेल आणि 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 च्या आतमध्ये एकही व्यवहार केला नसेल तर तो सुरक्षेच्या कारणासाठी RBI द्वारा रद्द केला जाईल
- डेली पेमेंट लिमिट यूपीआय पेमेंट वर आता लिमिटेशन लावण्यात येणार -Daily Limit on UPI Payment–
दुसऱ्या नियमाप्रमाणे UPI वरील डेली पेमेंट लिमिट आता फक्त एक लाखांपर्यंत असेल एक लाखांवरचा कोणताही व्यवहार तुम्ही आता यूपीआय वापरून करू शकणार नाही.
स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत असणार आहे – Special Payment Limit-
शाळा कॉलेज मधील फी आणि हॉस्पिटल्समधील बिलाचे व्यवहार पेमेंट तुम्ही एका दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता. यालाच स्पेशल पेमेंट लिमिट असे म्हटले जाते.
ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम – Transaction Settlement Time
वाढते सायबर गुन्हे थांबवण्यासाठी जानेवारी 2024 पासून 2000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तास लागणार आहेत, आत्तापर्यंत या सिस्टीम मध्ये UPI ने केलेले पेमेंट लगेच समोरच्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जमा व्हायचं, पण आता 2024 पासून कोणत्याही नवीन व्यक्तीशी केलेला यूपीआय व्यवहार पूर्ण व्हायला ४ तास लागणार आहेत. तुम्ही कोणाशीही नेहमी व्यवहार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार नाहीये.
यूपीआय ट्रांजेक्शन कॅन्सल ऑप्शन हा सुद्धा खूप महत्त्वाचा बदल आहे – UPI Transaction Cancel Option
तुम्ही जर कोणत्याही नवीन व्यक्तीसोबत यूपीआय व्यवहार करत असाल, आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की ही व्यवहार रद्द केला गेला पाहिजे तर तुम्ही ४ तासाच्या आत पेमेंट कॅन्सल करू शकता. त्यानंतर तुम्ही दुसऱ्याला पाठवलेले पैसे तुमच्या खात्यात रिवर्ट केले जातील. ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून चुकून होणारे व्यवहार किंवा फसवे व्यवहार यांपासून नगरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून हा नविन नियम सुरु करण्याच आला आहे.
बँक अकाउंट नेम यूपीआय मध्ये डिस्प्ले होणार – Bank Account Name will be displayed on UPI
1 जानेवारी 2024 नंतर तुम्ही कुठेही यूपीआय पेमेंट करायला गेलात तर त्या विक्रेत्याचा खरं नाव तुम्हाला पेमेंट करताना दिसणार आहे. बँकींग व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
यूपीआय क्रेडिट लाईन पेमेंट- UPI Credit Line Payment-
आतापर्यंत आपण आपल्या अकाउंट मध्ये पैसे असतील तरच पेमेंट करू शकत होतो. पण आता जानेवारी 2024 पासून बँकेला रिक्वेस्ट करून आपण क्रेडिट मिळवू शकणार आहोत. ही सुविधा बँक तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर CIBIL Score तपासून ही सुविधा उपलब्ध करुन देऊ शकेल.
यूपीआय एटीएम – UPI ATM
RBI आता यूपीआय एटीएम UPI ATM सुविधा सुरु करीत आहे. यासाठी RBI ने जपान मधल्या हिताची कंपनीसोबत समन्वयाचा करार केला आहे. आता काही दिवसातच यूपीआय एटीएम भारतात सर्व राज्यांमध्ये पुरविले जाणार आहेत. या UPI ATM च्या मदतीने नागरिक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधून पैसे काढू शकणार आहेत तसेच क्यूआर कोड स्कॅन (UPI QR Code Scan) करून देखील नागरिकांना पैसे काढता येणार आहेत.
यूपीआय ट्रांजेक्शन चार्ज- UPI Transaction Charges
युपीआय वॉलेटमध्ये तुम्ही पैसे जमा करुन त्यातून यूपीआय पेमेंट केले असेल तर त्या विक्रेत्याला 1.1% सर्विस चार्ज द्यावा लागणा आहे. युपीआयच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचे मुल्य विक्रेत्याला भरावे लागणार आहे.
यूपीआय साठी आता टॅप अँड पे ऑप्शन येऊ शकतो- UPI Tap & Pay Option-
जसे आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरते यूपीआय द्वारा पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच टॅप अँड पे सुविधा उपलब्ध होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation of India) ने ही सर्विस देणारी प्रोसेस सुरू केली आहे.