Wheat Water Management: गव्हाच्या पिकाला कधी पाणी दिले पाहिजे? कृषी तंज्ञाचा महत्वाचा सल्ला

Wheat Water Management

Wheat Water Management: अनेक भागात जवळपास गहू पेरणी झाली आहे. परंतु, अजून काही शेतकऱ्यांंची गहू पेरणी बाकी आहे. साधारणपणे 15 डिसेंबर पर्यंत गहू पेरणी करू शकता. अनेकजण 15 डिसेंबर नंतर देखील पेरणी करतात. मात्र, कृषी तंज्ञाच्या म्हणण्यानुसार, 15 डिसेंबर नंतर गव्हाची पेरणी करू नये असा सल्ला देतात.

परंतु, कृषी तंज्ञाच्या सांगणं असं आहे की, 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंतच गव्हाची पेरणी करावी. जर उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात घट होते. खरंतर गहू हे एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे. ज्यामुळे या पिकाची बहुतांशी भागात पेरणी केली जाते.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असतांना देखील सुद्धा बऱ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली आहे. यावर्षी कमी पावसामुळे गव्हाच्या लागवडी मध्ये घट झाल्याने यंदा मागील वर्षापेक्षा गव्हाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज आहे. ज्या ठिकाणी पुरेसा पाऊस झाला आहे किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा आहे, अशा भागात मात्र गहू पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

गव्हाचे उत्पादन मिळविण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी होय.. पाण्याशिवाय गव्हाची पेरणी होऊ शकत नाही. यासाठी गव्हाचे पिकातील पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे देखील आवश्यक आहे. पिकाचे योग्य पाणी व्यवस्थापन झाले नाही तर उत्पादनात मोठी घट दिसून येते. यासाठी पाणी कधी देणं आवश्यक हे माहीत असणं आवश्यक आहे.

कृषी तंज्ञाच्या माहितीनुसार, गव्हाच्या पिकासाठी अतिशय हलकी मुरमाड आणि खूप भारी जमीन योग्य नसते. तर यासाठी मध्यम ते भारी जमिनीत गव्हाची पेरणी केली तर चांगले उत्पादन मिळते. तुम्ही वेळेवर पेरणी केली, जमीन देखील योग्य निवडली..

मोदी सरकारची मुद्रा योजना. मिळेल ५०,००० ते १० लाखांपर्यंत तात्काळ लोन

आता तुम्हाला गव्हाचे पाणी व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. गव्हाला कधी, कसं व किती पाणी दिले पाहिजे? शेतकऱ्यांना हे जर माहिती झाले तर भरघोस उत्पन्न घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही तुम्हाला गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे केले पाहिजे याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती देणार आहोत.

गहू पाणी व्यवस्थापन (Wheat Farming)
कृषी तंज्ञाच्या माहितीनुसार, जर तुम्ही मध्यम ते भारी जमिनीत गव्हाची पेरणी केली असेल तर 21 दिवसाच्या अंतराने पाच पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत.

शेतकरी बांधवांनी गहू पिकाला मुकुट मुळे फुटण्याच्या, कांडी धरणे, फुलोरा व चीक भरणे अशा अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये. जर समजा तुमच्याकडून एकच पाणी देणं शक्य होत असेल तर पेरणी नंतर 40 ते 42 दिवसांनी पाणी द्यावे.

जर शेतकऱ्यांकडे दोन पाणी देणं जर शक्य होत असेल तर शेतकऱ्यांनी पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी आणि 60 ते 65 दिवसांनी पाणी दिले पाहिजे असा कृषी तंज्ञानी सल्ला दिला आहे.

तसेच जर हलक्या जमिनीत गव्हाची लागवड केली असेल तर शेतकऱ्यांनी 15 ते 20 दिवसांनी पाणी दिले पाहिजे. ‘gahu pani niyojan’

हलक्या जमिनीत लागवड केलेल्या गव्हाच्या पिकाला 15 ते 20 दिवसांच्या अंतराने कमी प्रमाणात (चार ते पाच सेंटीमीटर उंचीचे) पाणी दिले पाहिजे, असा कृषी तंज्ञाचा सल्ला आहे.

ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल. अशाप्रकारे तुम्ही गव्हाचे पाणी व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन मिळवू शकता. तसेच गव्हाच्या पिकाला मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 21 दिवसाच्या काळात पाण्याचा ताण जर पडला तर उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

या अवस्थेत गव्हाच्या पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नका :- पेरणीच्या वेळी, मुकुट मुळे फुटण्याच्या वेळी, कांडी धरणे, फुलोरा व चीक भरणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नका.

ही माहिती शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची आहे. शेतकऱ्यांसाठी विविध पिकांच्या संपूर्ण व्यवस्थापन बाबत माहिती आपण देत जाऊ. परंतु, तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करण्यासाठी ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना व तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा.